Advertisement

शिवसेना, काँग्रेसकडून रिलायन्सची दलाली - आशिष शेलार


शिवसेना, काँग्रेसकडून रिलायन्सची दलाली - आशिष शेलार
SHARES

शीव - मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी गुरुवारी भोईवाडा, वडाळा, वांद्रे अश्या तीन ठिकाणी सभा घेतल्या. यावेळी आशिष शेलार यांनी शिवसेना आणि काँग्रेसवर टीका केली. गेल्या 22 वर्षांपासून रखडलेले वडाळा विभागातील एसआरए आणि झोपडपट्टी पुनर्विकासाचे काम हे येथे काँग्रेसचे आमदार आणि शिवसेनेचा नगरसेवक असल्यावर कशी काय पूर्ण होतील? शिवसेना आणि काँग्रेसची युती असल्यामुळे रिलायन्सची दलाली करून मोकळ्या खेळाच्या मैदानात यांनी टॉवर उभे केलेत. पण झोपडपट्टी सुधारायची गरज यांना वाटली नाही. वडाळा विभागातील सभेला एवढी गर्दी पाहून भाजपाचा विजय होण्यापासून कोणीच रोखणार नाही, असंही आशिष शेलार म्हणाले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा