भाजपाचे 'स्पेशल 32' लोकलमध्ये!

 Mumbai
भाजपाचे 'स्पेशल 32' लोकलमध्ये!

मुंबई - पालिका निवडणुकीच्या तोंडावर आता प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. लोकांमध्ये काय चर्चा सुरू आहेत हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक पक्ष उत्सुक असतो आणि यासाठी आता भाजपाने देखील पुढाकार घेतला आहे. भाजपाच्या मंत्र्याने 32 जणांची टीम बनवलेली आहे. हे 32 जण ट्रेनमध्ये जाऊन राजकीय चर्चेवर लक्ष ठेवतात. त्या चर्चा ऐकून आपल्या मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम हे 32 जण करतात. यामुळे लोकांच्या भावना काय आहेत आणि जनमानसात काय चर्चा सुरू आहे याची माहिती मिळत असल्याचं एका मंत्र्याने सांगितलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 25 वर्षांच्या युतीत शिवसेना सडली असं वक्तव्य केलं होतं. मात्र त्यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये वेगळी चर्चा होती. पक्षाचे नेते लँड क्रुझर गाड्या घेऊन फिरतात, पण कार्यकर्ते सडले अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये होती अशी माहिती याच टीमकडून मिळाल्याचं या मंत्र्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगतली.

Loading Comments