Advertisement

आमदार संतोष बांगर पुन्हा वादात, पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप

मात्र, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी आरोप फेटाळून लावले आहेत.

आमदार संतोष बांगर पुन्हा वादात, पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप
SHARES

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी आता मंत्रालयातल्या पोलिस कर्मचाऱ्याला शिवागाळ केल्याचा आरोप होतोय. याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्याने वरिष्ठांकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर हा प्रकार समोर आला.

मात्र, आमदार संतोष बांगर यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच मंत्रालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासावे. सारे सत्य समोर येईल, अशी मागणीही माध्यमांशी बोलताना केली आहे.

नेमके प्रकरण काय?

शिंदे गटाचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी शिवीगाळ केल्याची लेखी तक्रार मंत्रालयातील पोलिस कर्मचाऱ्याने वरिष्ठांकडे नोंदवली आहे. 27 ऑक्टोबरची ही घटना आहे. या दिवशी आमदार बांगर आपल्या कार्यकर्त्यांसह मंत्रालयाच्या गेटवर आले. तेव्हा पोलिस कर्मचाऱ्याने बांगर यांच्यासोबत असलेल्या पंधरा कार्यकर्त्यांच्या पासची विचारणा केली. यामुळे बांगर यांनी पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातल्याचे समोर आले आहे.

पोलिस कर्मचाऱ्याने कार्यकर्त्यांना एन्ट्री पास मागताच बांगर भडकले. तुम्ही मला ओळखले नाही का? अशी विचारणा त्यांनी पोलिस कर्मचाऱ्याला केली आणि तिथे उपस्थित असलेल्या पोलिस अधिकाऱ्याला केली. यावेळी त्यांनी पोलिस अधिकाऱ्याला शिवीगाळही केल्याचे समजते. त्यानंतर व्यथित झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याने अखेर वरिष्ठांकडे लेखी तक्रार दिली. या तक्रारीनंतर हा सारा प्रकार समोर आला आहे.

बांगर काय म्हणाले?

आमदार संतोष बांगर यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. आपण पोलिस बांधवांशी हुज्जत घातली नाही. पोलिस कर्मचाऱ्याने मला ओळखले नव्हते. मात्र, नंतर ओळखले. त्या कर्मचाऱ्याने घाबरून लेखी तक्रार केली असावी. मी कोणताही वाद घातला नाही. त्याठिकाणी सीसीटीव्ही आहेत. ते तपासा. दूध का दूध, पाणी का पाणी होईल.



हेही वाचा

Maharashtra Political Crisis: सत्तासंघर्षाची सुनावणी 4 आठवडे लांबणीवर

गुजरातचे 'अच्छे दिन', महाराष्ट्राच्या हातून आणखी एक प्रकल्प निसटला

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा