Advertisement

शिवस्मारकाचे काम पारदर्शक पद्धतीनेच झाले पाहिजे

अरबी समुद्रात नियोजित शिवस्मारकाच्या सद्य:स्थितीचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली

शिवस्मारकाचे काम पारदर्शक पद्धतीनेच झाले पाहिजे
SHARES
छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक झाले पाहिजे, हीच प्रत्येकाची इच्छा आहे. मात्र या स्मारकाच्या उभारणीत जनतेचा पैसा लागणार असल्याने हे काम पारदर्शक पद्धतीनेच झाले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत.

हेही वाचाः- मुंबईच्या तापमानात आणखी वाढ होणार

अरबी समुद्रात नियोजित शिवस्मारकाच्या सद्य:स्थितीचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. मंत्रालयात झालेल्या या बैठकीला सचिव (बांधकामे) अजित सगणे यांच्यासह अनेक प्रमुख अधिकारी उपस्थित होते. स्मारकाच्या कामाची सध्याच्या स्थितीची माहिती घेऊन अशोक चव्हाण म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाच्या निविदा प्रक्रियेवर कॅगने गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. न्यायालयात याचिका दाखल झालेल्या आहेत. पर्यावरणासंदर्भात केंद्र शासनाकडून अनुमती मिळवताना विहित प्रक्रियेचे पालन झाले नसल्याच्या तक्रारी आहेत. स्मारक आणि पर्यटकांच्या सुरक्षेसंदर्भात अजूनही शंका व्यक्त केल्या जात आहेत. यासंदर्भात विधीमंडळातही प्रश्न उपस्थित झालेले आहेत. या पार्श्‍वभूमीवर या सर्व मुद्यांचे निराकरण तातडीने व्हावे; जेणेकरून स्मारकाच्या कामाला गती देता येईल, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी या बैठकीत मांडली. प्रकल्प अधिकार्‍यांनी या सर्व मुद्यांवर आपला अहवाल तयार करावा, असे निर्देशही सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी यावेळी दिले.

हेही वाचाः- एक अर्ज अवैध झाल्याने राज्यसभा निवडणूक बिनविरोध

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Shiv sangram leader vinayak mete) यांनी बुधवारी शिवस्मारक समिती अध्यक्षपदाचा राजीनामा (resignation) दिला. विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना पत्र पाठवत आपला राजीनामा सुपूर्द केला. या पत्रात त्यांनी शिवस्मारकाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं, अशी इच्छा देखील व्यक्त केली आहे. भाजप सरकारने २०१५ साली विनायक मेटे यांच्याकडे स्मारक समितीच्या (shiv smarak committee) अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. तेव्हापासून ते या पदावर होते. शिवस्मारकाचं काम जलदगतीने पूर्ण होण्यासाठी राज्य सरकारकडून अपेक्षित मदत न मिळाल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं म्हटलं जात आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा