Advertisement

शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिनाला मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

शिवसेनेचा ५३ वा वर्धापन दिन बुधवारी सायन येथील षण्मुखानंद सभागृहात साजरा होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खास उपस्थित राहणार आहेत.

शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिनाला मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
SHARES

शिवसेनेचा ५३ वा वर्धापन दिन बुधवारी सायन येथील षण्मुखानंद सभागृहात साजरा होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खास उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेच्या वर्धापन दिनाला पहिल्यांदाच दुसऱ्या पक्षातील नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. शिवसेनेच्या इतिहासातील पहिलीच वेळ ठरणार आहे.

शिवसैनिकांना मार्गदर्शन

वर्धापन दिननिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संध्याकाळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपा युती भक्कम असल्याचा संदेश याद्वारे दिला जाण्याची शक्यात वर्तवली जात आहे. 

निवडणुकीच्या तोंडावर कार्यक्रम

लोकसभेप्रमाणं महाराष्ट्र विधानसभा निवडणूकही शिवसेना आणि भाजपानं एकदिलाने लढावी आणि मोठा विजय मिळवावा, यासाठी युतीचे वरिष्ठ नेते यानिमित्तानं एकाच व्यासपीठावर येणार आहेत. शिवसेनेचा वर्धापन दिन कार्यक्रम बुधवारी सायंकाळी ५ वाजता षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यासह युवा नेते आदित्य ठाकरे यांचे प्रमुख भाषण होईल. लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा कार्यक्रम होत आहे.हेही वाचा -

दुकानातील मॅनीक्वीन्स हटवा, शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रेंचा आदेश

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
संबंधित विषय
Advertisement