Advertisement

दुकानातील मॅनीक्वीन्स हटवा, शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रेंचा आदेश

मुंबई महानगर पालिकेतील कायदा समितीच्या अध्यक्ष आणि शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी दुकानातील बेकायद अंतर्वस्त्राचे पुतळे हटवण्याचे आदेश दिले आहेत.

दुकानातील मॅनीक्वीन्स हटवा, शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रेंचा आदेश
SHARES

महापालिकेच्या कायदा समितीनं दुकानांच्या बाहेरील 'मॅनीक्वीन्स' हटविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगर पालिकेतील कायदा समितीच्या अध्यक्ष आणि शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी दुकानातील बेकायद अंतर्वस्त्राचे पुतळे हटवण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई महापालिका प्रशासनाला हा आदेश देताना कोणीही नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास परवाना रद्द करण्यासही सांगितले आहे.

अंतर्वस्त्राची जाहीरात

अनेक दुकानांबाहेर अंतर्वस्त्राची जाहीरात करण्यासाठी या पुतळयाचा वापर करण्यात येतो. महिलांच्या कपडयांची विक्री करणाऱ्या  दुकानांबाहेर अंतर्वस्त्राची जाहीरात करण्यासाठी असे पुतळे उभे केलेले असतात. मात्र, हे पुतळे महापालिकेनं आता हटविण्यास सांगितलं आहे. दुकानदारांना १५ दिवसांच्या आत हे पुतळे हटवायचे आहेत. 

याआधी भाजपाच्या माजी नगरसेविका रितू तावडे २०१३ पासून अंतर्वस्त्राच्या या मॅनीक्वीन्स विरोधात आवाज उठवत आहेत. महापालिकेच्या आदेशामुळे अंतर्वस्त्राचे अशा प्रकारचं प्रदर्शन बंद होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 



हेही वाचा -

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

गणिताच्या पुस्तकातील बदल स्विकारा- अतुल कुलकर्णी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा