Advertisement

युतीचा फाॅर्म्युला अजून ठरलाच नाही- चंद्रकांत पाटील

भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील मात्र युतीचा कोणताही फॉर्म्युला अजून ठरलेला नसल्याचं म्हणत आहेत. यावरून युतीचा तिढा लवकर सुटणार नाही, असंच दिसत आहे.

युतीचा फाॅर्म्युला अजून ठरलाच नाही- चंद्रकांत पाटील
SHARES

एका बाजूला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीचा फाॅर्म्युला लोकसभा निवडणुकीआधीच ठरलेला आहे, असं सांगत असतानाच भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील मात्र युतीचा कोणताही फॉर्म्युला अजून ठरलेला नसल्याचं म्हणत आहेत. यावरून युतीचा तिढा लवकर सुटणार नाही, असंच दिसत आहे.

भाजपाची निवडणूक समितीची बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, शिवसेनेसोबत युती १०० टक्के होणार असली, तरी अजून  युतीचा कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे जागा वाटपाचा अंतिम निर्णय घेतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

शिवसेना-भाजपामध्ये १२६-१६२ जागांचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीसंबंधी चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीत शिवसेनेला सन्मानजनक जागा मिळणार असतील, तरच युतीवर शिक्कामोर्तब होईल,' असं उद्धव यांनी शिवसेना नेत्यांना सांगितल्याचं सूत्रांकडून समजत आहे. 

दरम्यान, २२ सप्टेंबरला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह मुंबईत येत असून यावेळी युतीची घोषणा होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 



हेही वाचा-

युतीचा फाॅर्म्युला लोकसभेलाच ठरलाय- उद्धव ठाकरे

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी मुंबईत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा