Advertisement

विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे, निलम गोऱ्हेंचं नाव निश्चित

विधान परिषदेच्या या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निलम गोऱ्हे या दोघांची (uddhav thackeray and neelam gorhe) नावं निश्चित करण्यात आली आहेत.

विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे, निलम गोऱ्हेंचं नाव निश्चित
SHARES

येत्या २१ मे रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक (maharashtra vidhan parishad election) होणार आहे. विधान परिषदेच्या या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निलम गोऱ्हे या दोघांची (uddhav thackeray and neelam gorhe) नावं निश्चित करण्यात आली आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने (election commission of india) शुक्रवार १ मे रोजी महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुका घेण्यास परवानगी दिली होती. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीबाबत (mlc) निर्माण झालेला गुंता सुटला असून राज्यात तीन आठवड्यांपासून सुरू असलेला महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपमधील राजकीय संघर्ष देखील संपल्यात जमा आहे. 

हेही वाचा - निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, यामुळे उद्धव ठाकरेंची खुर्ची वाचणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे नियमानुसार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून ६ महिन्यांत त्यांना विधीमंडळाचा सदस्य होणं बंधनकारक आहे. २७ मे २०२० रोजी त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन ६ महिने पूर्ण होत आहेत. त्याआधीच म्हणजे २१ मे रोजी विधान परिषदेची निवडणूक जाहीर करण्यात आल्याने त्यांच्या मुख्यमंत्रीपदावरील टांगती तलवार आता दूर झाली आहे. 

महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र पाठवून २४ एप्रिलपासून रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक घेण्याची विनंती केली होती. तसंच पत्र महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंंह कोश्यारी यांनी देखील निवडणूक आयोगाला पाठवलं होतं. या विनंतीनुसार ४ मे रोजी विधान परिषद निवडणुकीची अधिसूचना निवडणूक आयोगाकडून जारी होईल.  

यानुसार या ९ जागांसाठी उमेदवारांना ११ मेपर्यंत अर्ज भरता येतील. १२ मे रोजी अर्जांची छाननी आणि १४ मेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. आवश्यकता भासल्यास २१ मे रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ४ या वेळेत मतदान होईल आणि त्यानंतर ५ वाजल्यापासून मतमोजणी होईल.

हेही वाचा - महाराष्ट्रावर संकट येताच परप्रांतीय पळ काढतात, आपल्या मराठी तरूणांना संधी द्या- राज ठाकरे

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा