Advertisement

उद्धव ठाकरे यांची खासदारांकडून स्वबळाची चाचपणी


उद्धव ठाकरे यांची खासदारांकडून स्वबळाची चाचपणी
SHARES

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या प्रत्येक सभेत सत्तेतील भागीदार भाजपाला फटकारताना स्वबळाचा नारा देताना दिसतात. त्यातच निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्याने शिवसेनेने भाजपापासून फारकत घेऊन एकट्याने निवडणूक लढवल्यास त्याचा फायदा होईल की तोटा? याची चाचपणी करण्यास त्यांनी सुरूवात केली आहे. त्यानुसार मातो़श्री निवासस्थानी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत उद्धव यांनी शिवसेना खासदारांमार्फत स्वबळाची चाचपणी केल्याचं समजत आहे.


बैठकीचं आयोजन

स्वबळाची भाषा करताना प्रत्येक मतदारसंघात शिवसेनेला किती जोर लावावा लागेल, काय डावपेच लढवावे लागतील? यावर सध्या पक्षप्रमुख आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा खल सुरू आहे. त्याचबरोबर पक्षातील नेमके किती नेते स्वबळाच्या लढ्यासाठी तयार आहेत? याचाही दुसऱ्या बाजूला विचार सुरू आहे. अशा स्थितीत लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने एकट्याने लढल्यावर काय फायदा होईल? आघाडीच्या उमेदवाराचा प्रभाव कितपत असेल, याची चाचपणी करण्यासाठी एका बैठकीचं आयोजन केलं होतं.


कुणाचा समावेश?

या बैठकीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासह चंद्रकांत खैरे, भावना गवळी, आनंदराव अडसूळ आणि कृपाल तुमाने असे एकूण ५ खासदार आणि आमदार एकनाथ शिंदे, आ. दिवाकर रावते आणि आ. रामदास कदम असे ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. या बैठकीत खासदारांना त्यांच्या लोकसभा मतदारसंघात स्वबळाला कितपत अनुकूल परिस्थिती आहे ? यासंदर्भात विचारणा करण्यात आल्याचं समजत आहे.



हेही वाचा-

राज्यात डिझेलही ४ रुपयांनी स्वस्त होणार- मुख्यमंत्री

दसऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांचं अयोध्येला प्रयाण!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा