Advertisement

ठोकशाही आम्ही दांडक्याने मोडून काढू - उद्धव ठाकरे


ठोकशाही आम्ही दांडक्याने मोडून काढू - उद्धव ठाकरे
SHARES

सध्या लोकशाहीच्या मार्गाने ठोकशाही सुरू आहे. मात्र ही ठोकशाही आम्ही दांडक्याने मोडून काढू. मी आंदोलनाचे नेतृत्व करायला नव्हे, तर नेतृत्वाला ताकद द्यायला आलो आहे, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीने छेडलेल्या आंदोलनात बुधवारी दुपारी भाग घेत महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले. शिवसेनेच्या पाठिंब्याने या आंदोलनाला धार आल्याचे म्हटले जात आहे.



मानधनवाढीच्या मुद्द्यावर सध्या राज्यभरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे मुंबईतील आझाद मैदानात मागील १५ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र या आंदोलकांच्या मागण्यांकडे राज्य सरकार सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आंदोलक संतापले असून ८ दिवसांत मागण्यांची पूर्तता न केल्यास मंत्रालयात घुसू, असा इशारा कृती समितीने सरकारला दिला आहे.



काय म्हणाले उद्धव ?

  • आमची मने अजून जिवंत आहेत
  • मुर्दाड मनाने आम्ही कारभार करु शकत नाही
  • माझे मंत्री देखील झोपत नाही
  • माता भगिनींची झोप उडवून तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करायला दौरे करतात
  • निवडणूक आल्यावर तुम्हाला शिवरायाची आठवण येते
  • शिवाजी महाराज्यांच्या माता भगिनींचे शाप तुम्हाला लागल्या शिवाय राहणार नाहीत
  • वेडा झालेला विकास राज्याला आणि देशाला परवडेल का?
  • इतिहासाची पुनरावृत्ती घडवायची इच्छा असेल, तर पुनरावृत्ती करायची माझी तयारी आहे


पंकजा मुंडे यांना टोला -

लाडू द्यायचे की चिक्की द्यायची हे तुम्ही ठरवा, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडे यांना टोला हाणला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या विरोधात आंदोलकांनी मैदानात जोरदार घोषणाबाजी केली.



हेही वाचा -

आंदोलनामुळे शिवसैनिक चार्ज

'अच्छे दिन नही, महंगाईके बुरे दिन...' महागाईविरोधात शिवसेना रस्त्यावर

शिवसेना दिवाळीपूर्वीच फोडणार फटाका?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)
 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा