...तर मी इथं भाजपाच्या प्रचारासाठी आलो असतो- उद्धव ठाकरे

भाजपाची अवलादच "गरज सरो वैद्य मरो" अशी असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. एखाद्या कुटुंबानं, एखाद्या माणसानं एका विचारासाठी आणि एका पक्षासाठी काम केलं, त्या विचारांसाठी स्वत:वर हल्ले झेलून पक्ष रुजवला. तो माणूस मेल्यानंतर त्याला आणि त्याच्या कुटुंबाला विसरणं ही भाजपाची संस्कृती आहे. पण शिवसेना मात्र या दिशेने कधीच जाऊ शकत नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

  • ...तर मी इथं भाजपाच्या प्रचारासाठी आलो असतो- उद्धव ठाकरे
SHARE

पालघर लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा करण्याचा शिवसेनेनं कधीच विचार केला नव्हता. भाजपानं प्रामाणिकपणानं श्रीनिवास वानगा यांना उमेदवारी दिली असती, तर मी आज इथं भाजपाचा प्रचार करायला आलो असतो, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या टिकेला उत्तर दिलं.


काय म्हणाले होते योगी?

पालघर पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत बुधवारी भाषण करताना योगी आदित्यनाथ यांनी ''श्रीनिवास वानगा हा आमचा अंतर्गत प्रश्न होता, त्यात शिवसेनेला नाक खुपसण्याची गरज नव्हती'' या शब्दांत सुनावलं होतं.


मोखाड्यात उत्तर

पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पालघर जिल्ह्यात सध्या प्रचारसभांचा धडाका सुरू असून शिवसेना आणि भाजपा एकमेकांविरोधात रोजच्या रोज कुरघोड्या करताना दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपातील वरिष्ठ नेते प्रचारसभेत उतरून शिवसेनेवर टिकास्त्र सोडत असतानाच भाजपानं योगींनाही प्रचारसभेत उतरवलं. तरीही हार न मानता शिवसेनेची थेट अफलझखानशी तुलना करणाऱ्या योगीला आणि भाजपाला गुरूवारी मोखाड्यातील प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिलं.काय म्हणाले उद्धव?

निवडणुकीत मत मिळवण्यासाठी भाजपाला चिंतामण वानगांचा फोटो पाहिजे. पण त्यांच्या मुलाला श्रीनिवास वानगाला उमेदवारी द्यायची नाही. भाजपाची अवलादच "गरज सरो वैद्य मरो" अशी असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. एखाद्या कुटुंबानं, एखाद्या माणसानं एका विचारासाठी आणि एका पक्षासाठी काम केलं, त्या विचारांसाठी स्वत:वर हल्ले झेलून पक्ष रुजवला. तो माणूस मेल्यानंतर त्याला आणि त्याच्या कुटुंबाला विसरणं ही भाजपाची संस्कृती आहे. पण शिवसेना मात्र या दिशेने कधीच जाऊ शकत नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.


बाहेरून माणसं आयात

मोखाड्यातील प्रचारसभेत योगींना चिमटे काढण्याची संधी उद्धव ठाकरे यांनी सोडली नाही. कुणीतरी बुवा येतो, थापा ठोकतो आणि निघून जातो, पण आमचं तसं नाही. मी आदिवासी पाड्यात इतक्या लांब केवळ तुम्हाला भेटायला, तुमच्याशी बोलायला आलो आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मतदारांना भावनिक साद घातली. योगींना उद्देशून भाजपाकडं वानगानंतर प्रचारासाठी माणसं नसल्यानं बाहेरून माणसं मागवली जात असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं.


भगवा विचार विसरले

भाजपाचा भगवा विचार आता राहिलेला नाही, पक्षात थैली दाखवल्यावर प्रवेश मिळतो. पण शिवसेनेचं तसं नाही. जीवाभावाची माणसं हेच शिवसेनेचं धन असल्याचे उद्धव म्हणाले.

येत्या २८ मे रोजी पालघर पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून आता प्रचारासाठी जेमतेम दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे पुढची दोन दिवस प्रचाराचा चांगलाच धुराळा उडणार हे नक्की.हेही वाचा-

'शिवाजीचं नाव घेऊन अफझलखानासारखं काम', योगीचा शिवसेनेवर बाण

आता पालघरसुद्धा दणकून घेऊ- संजय राऊतसंबंधित विषय
ताज्या बातम्या