Advertisement

'शिवाजीचं नाव घेऊन अफझलखानासारखं काम', योगीचा शिवसेनेवर बाण

एकीकडं भाजपाचा फायरब्रँड, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तर दुसकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. योगी आदित्यनाथांनी शिवसेेनेला अप्रत्यक्षरित्या 'अफलखानाची उपमा' देत शिवसेनेवर घणाघाती टीका केली तर दुसरीकडं उद्धव ठाकरे यांनी 'अबकी बार फुसका बार' म्हणत एका अर्थानं मोदीमुक्त, भाजपमुक्त देशाची हाक देत अंगावर येणाऱ्या भाजपाला शिंगावर घेतलं.

'शिवाजीचं नाव घेऊन अफझलखानासारखं काम', योगीचा शिवसेनेवर बाण
SHARES

पालघरची लोकसभा पोटनिवडणूक चांगलीच रंगली असून बुधवारी प्रचारात खरी रंगत आली. वसई-विरार आणि पालघरवासीयांनी एकाच दिवशी दोन झंझावाती सभा अनुभल्या. एकीकडं भाजपाचा फायरब्रँड, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तर दुसकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. योगी आदित्यनाथांनी शिवसेेनेला अप्रत्यक्षरित्या 'अफलखानाची उपमा' देत शिवसेनेवर घणाघाती टीका केली तर दुसरीकडं उद्धव ठाकरे यांनी 'अबकी बार फुसका बार' म्हणत एका अर्थानं मोदीमुक्त, भाजपमुक्त देशाची हाक देत अंगावर येणाऱ्या भाजपाला शिंगावर घेतलं.


दिग्गज आमने-सामने

पालघर लोकसभा पोटनिवडणूक शिवसेना आणि भाजपा दोघांनीही प्रतिष्ठेची केली असून ही निवडणूक जिंकण्यासाठी चांगलाच जोर लावला आहे. त्यामुळेच प्रचारासाठी वाट्टेल ते असं म्हणत भाजपानं थेट योगी आदित्यनाथांना पाचरण केलं. तर दुसरीकडं उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. बुधवारी विरारस-वसईत उद्धव ठाकरे यांच्या दोन सभा, तर योगी आदित्यनाथांची विरारमध्ये सभा पार पडली. विरारमधील सभेत उद्धव ठाकरे आणि योगी आदित्यनाथ या दोघांनी एकमेकांच्या पक्षाविरोधात टीका करत प्रचाराचा धुराळाच उडवून दिला.


काय म्हणाले योगी?

शिवाजीचं नाव घेत अफलखानासारखं काम केलं जात आहे, असं म्हणत योगी आदित्यनाथांनी शिवसेनेला टोला मारला. तर वानगाच्या प्रकरणात शिवसेनेला नाक खुपसण्याची काहीही गरज नव्हती, तो भाजपाचा अंतर्गत प्रश्न असल्याचं म्हटलं. योगी आदित्यनाथांनी भाषणात प्रामुख्यानं बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेत त्यांचं कौतुक करत मतदारांना भावनिक आवाहन चुचकारण्याचाही प्रयत्न केला.

बाळासाहेबांना आम्ही कधीच विसरू शकत नाही. त्यांनी कधीचा आमच्या पाठीत खंजीर खुपसला नव्हता, असं म्हणत सध्या राज्यात शिवसेना भाजपाबरोबर जे काही वागत आहे त्यावरही भाष्य केलं. महत्त्वाचं म्हणजे योगी आदित्यनाथांनी पालघरच्या प्रचारसभेत भाजपानं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कशी चांगली कामं केली आहे हे सांगताना उत्तर प्रदेश भाजपामुळं कसा बदलत चालला आहे, याचाही पाढा वाचला.


काय म्हणाले उद्धव?

दुसरीकडं उद्धव ठाकरे यांनीही भाजपाला, पंतप्रधान नरेंद्र मोदींना कडवं आव्हान देण्याचा प्रयत्न केला. आम्ही कुत्रे असलो तरी इमानदार आहोत, असं म्हणताच उद्धव ठाकरे यांनी फक्त निडणुकीपुरत भुंकू नका, हिम्मत असेल तर मर्दासारख लढा असं म्हणत घणाघाती हल्ला चढवला. अफलखानाची उपमा शिवसेनेला देणाऱ्या योगी आदित्यनाथांवरही उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला.


स्वत:चा मतदारसंघही राखता नाही आला

''जो मुख्यमंत्री स्वत:चा मतदारसंघ राखू शकला नाही, असा मुख्यंमत्री इथं येऊन प्रचार करतोय'' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथांना ठाकरी शैलीत उत्तर दिलं. तर मोदींनी कधी तर आमच्या देशात यावं असं म्हणत मोदींच्या परदेश दौऱ्यावरही टीका केली. योगी आदित्यनाथांनी जशी बाळासाहेब ठाकरे यांनी आठवण करून दिली त्याचप्रकारे उद्धव ठाकरे यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचीही आठवण करून दिली. जे वाजपेयींना विसरले ते वानगांना कसे लक्षात ठेवणार, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. तर वानगा यांचा बुलेट ट्रेनला विरोधात होता. त्यामुळेच श्रीनिवास वानगा भाजपाला नको असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.



हेही वाचा-

पालघरच्या आखाड्यात उद्धवचा सामना योगीशी

राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे भाजपात



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा