Advertisement

मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा उमेदवाराच्या प्रचाराकरीता आयोजित २० मे रोजीच्या २ सभेत पालघर जिल्यातील मतदारांना संबोधित केलं. या सभेत केलेल्या भाषणात त्यांनी पालघर आणि वसई, विरार परिसरातील मतदारांना प्रलोभन दाखवणारी वक्तव्ये केल्याचा आरोप काँग्रेस शिष्टमंडळाने केला.

मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार
SHARES

पालघर पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदारांना आमिष दाखवणारी वक्तव्य केल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्याची मागणी करणारा अर्ज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी दुपारी पालघर जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला.


कुठे केलं भाषण?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा उमेदवाराच्या प्रचाराकरीता आयोजित २० मे रोजीच्या २ सभेत पालघर जिल्यातील मतदारांना संबोधित केलं. या सभेत केलेल्या भाषणात त्यांनी पालघर आणि वसई, विरार परिसरातील मतदारांना प्रलोभन दाखवणारी वक्तव्ये केल्याचा आरोप काँग्रेस शिष्टमंडळाने केला.

दाव्यादाखल काँग्रेसच्या शिष्टमंडळाने त्यांच्या भाषणाची ध्वनीचित्रफीत असलेला पेनड्राइव्ह देखील अर्जासोबत जोडला आहे.


मुख्यमंत्री काय म्हणाले?

  • वसई विरार महापालिका हद्दीतून २९ गावांचा हरितपट्टा वगळू
  • पालघर जिल्ह्यात मेडिकल काॅलेज बांधलं जाईल
  • जुन्या काळातील शेतकऱ्यांचं सर्व खावटी कर्ज माफ करून नवीन कर्ज देऊ


त्वरीत कारवाईची अपेक्षा

भाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले निर्णय निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या आदर्श आचारसहिंतेचा भंग करणारे आहेत. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वतः हून गुन्हा दाखल करणं अभिप्रेत होतं. परंतु गेले २ दिवस वाट बघूनही मुख्यमंत्र्याविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल न झाल्याने आम्ही अधिकृतरित्या तक्रार दाखल करत आहोत. यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल, अशी अपेक्षा.
- सचिन सावंत, प्रवक्ते, काँग्रेस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक प्रचारात जाहीरनाम्यातील मुद्दे मांडले. त्यामुळे आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारे भंग झालेला नाही. निवडणुकीत प्रत्येक पक्षाला आपला जाहीरनामा सांगण्याचा अधिकार आहे. त्यानुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालघर मतदारसंघातील प्रचारात भाजपच्या जाहीरनाम्यातील काही मुद्दे मांडले. या मुद्द्यांचं सूतोवाच त्यांनी निवडणुकीपूर्वीही केलं आहे. त्यामुळे त्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची काँग्रेस उमेदवाराच्या प्रतिनिधीची तक्रार चुकीची आहे.

- केशव उपाध्ये, प्रवक्ते, भाजप


हेही वाचा-

पालघरच्या आखाड्यात उद्धवचा सामना योगीशी

पालघर पोटनिवडणुकीने गडबडलं परीक्षांचं वेळापत्रक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा