Advertisement

रामाच्या नावे आणखी किती निवडणुका लढवणार - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर विरोधकांकडून टिका होत आहे. निवडणूक जवळ आल्यानं शिवसेनेकडून हा मुद्दा उचलला जात असून यावर राजकारण होत असल्याचाही आरोप होत आहे. यासंबंधीच्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी, विरोधकांची काय कुवत आहे हे आपल्याला ठाऊक असल्याचं म्हणत राम मंदिराचं कुठंही राजकारण केलं जात नसल्याचंही म्हटलं आहे.

रामाच्या नावे आणखी किती निवडणुका लढवणार - उद्धव ठाकरे
SHARES

निवडणूक आली म्हणून राम मंदिराचा मुद्दा उचलला असं नसून आणखी किती निवडणुका भाजपा रामाच्या नावे लढणार हेच विचारण्यासाठी आपण अयोध्येला जात असल्याचं स्पष्टीकरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. शिवनेरी गडावर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं असून शिवनेरी गडावरील माती घेऊन ते शनिवारी, २४ नोव्हेंबरला अयोध्येला रवाना होणार आहेत.


विरोधकांची काय कुवत

उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर विरोधकांकडून टिका होत आहे. निवडणूक जवळ आल्यानं शिवसेनेकडून हा मुद्दा उचलला जात असून यावर राजकारण होत असल्याचाही आरोप होत आहे. यासंबंधीच्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी, विरोधकांची काय कुवत आहे हे आपल्याला ठाऊक असल्याचं म्हणत राम मंदिराचं कुठंही राजकारण केलं जात नसल्याचंही म्हटलं आहे. उलट भाजपा आणखी किती निवडणुकांमध्ये राम मंदिराचा मुद्दा घेणार आहे, किती निवडणुका या मुद्यावर लढणार आहे हे विचारण्यासाठी आपण जात असल्याचही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


माती नसून हिंदुच्या भावना 

अयोध्येत कुठलीही सभा होणार नसल्याचही यावेळी त्यांनी सांगितलं आहे. तर रामाच्या दर्शनासाठी आणि महाआरतीसाठी अयोध्येला आपण जात अाहेत. त्यामुळे राम मंदिर उभारणीच्या कार्याला वेग मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, गुरूवारी सकाळी उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजाच्या जन्मस्थळाला, शिवनेरीला भेट दिली. महाराजांना वंदन करत शिवनेरी गडावरील माती कलशात घेतली असून ही माती उद्धव ठाकरे अयोध्येला नेणार आहेत. ही केवळ शिवनेरीची माती नसून या तमाम हिंदुच्या भावना आहेत, त्याच भावना घेऊन आपण अयोध्येला जात असल्याचंही त्यानी सांगितलं आहे. 


शिवसैनिक अयोध्येकडं

उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतून मोठ्या संख्येने शिवसैनिक अयोध्येला रवाना होत आहेत. त्यानुसार गुरूवारीही मुंबई, मिरा-भाईंदर, औरंगाबाद येथून अनेक शिवसैनिकांनी अयोध्या गाठण्यासाठीचा प्रवास सुरू केला आहे. उद्धव ठाकरे शनिवारी अयोध्येला जाणार आहेत. 



हेही वाचा - 

दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या - भीम आर्मी

तुकाराम मुंढे नाशिकमधून मुंबईत




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा