Advertisement

“शिवसेना संपत आलेला पक्ष”, नड्डांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले...

संजय राऊत यांच्या अटकेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली.

“शिवसेना संपत आलेला पक्ष”, नड्डांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले...
SHARES

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीनं रविवारी रात्री अटक केली. त्यानंतर त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या अटकेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली.

"संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबद्दल मला निश्चित अभिमान आहे. संजय माझे जुने मित्र आहेत. मी आताच त्यांच्या कुटुंबियांना भेटून आलो. त्यांचा काय गुन्हा आहे, जे पटत नाही त्याविरोधात बोलतात. मरण आलं तरी शरण जाणार नाही, हे त्यांचं वाक्य अतिशय चांगलं आहे," अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचं वक्तव्य निर्घृण आणि घृणास्पद आहे. आपण राजकारणाची तुलना बुद्धिबळाशी करतो. पण सध्याचं राजकारण केवळ बळाचं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव यांनी राऊत यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर भाजपावर टीकास्त्र सोडलं. “आज मात्र ज्यांच्या डोक्यात हवा गेलीय त्यांना मी सांगू इच्छितो की निर्घृणपणाने वागू नका. दिवस आणि काळ हा नेहमी सर्वांसाठी चांगलाच असतो असं नाही. तो बदलत असतो. काळ बदलल्यानंतर आपण जसे लोकांशी वागलोय तसा तो बदलेला काळ कादाचित जास्त दृष्टपणाने निर्घृणपणाने तुमच्याशी वागू शकतो किंवा शकेल,” असा इशारा उद्धव यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. तसेच त्यांनी, “ती वेळ आतापर्यंत तरी आपल्या भारतात नाहीय. ती यापुढे येऊ देऊ नका,” असंही यावेळेस म्हटलं.

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या मातोश्री यांच्यामध्ये दहा मिनिटं भेट झाली. या भेटीच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी आईंच्या तब्येतीची सखोल विचारपूस केली. त्यांच्या पत्नी तसेच मुली देखील या भेटीदरम्यान उपस्थित होत्या.

'काहीही काळजी करु नका, शिवसेना आणि मी स्वतः तुमच्यासोबत आहे,' असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी निघताना दिलं.



हेही वाचा

संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा