Advertisement

संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी तीन दिवसांची ईडीची कस्टडी देण्यात आली आहे.

संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी
SHARES

शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी तीन दिवसांची ईडीची कस्टडी देण्यात आली आहे. त्यानुसार संजय राऊत 4 ऑगस्टपर्यंत कोठडीत असतील.

संजय राऊत यांनी आठ दिवसांची रिमांड मिळावी अशी मागणी ईडीने केली होती. तर संजय राऊत यांच्याकडे सर्व पैसा हा वैध मार्गांने आला आहे, त्यांच्यावर खोटी केस दाखल करण्यात आली आहे, तसेच संजय राऊत हे हर्ट पेशंट आहेत त्यामुळे त्यांना कमी दिवसांची रिमांड द्यावी अशी मागणी संजय राऊत यांच्या वकिलांनी केली होती. 

विशेष सरकारी वकीत हितेन यांनी संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबाला १ कोटी सहा लाखांचा फायदा झाल्याचं सांगितलं. ईडीने यावेळी प्रवीण राऊत हे संजय राऊतांचे फ्रंट मॅन असून आमच्याकडे किहीममधील जमीन विक्रेत्यांचे काही मालमत्तांबाबत जबाब असल्याची माहिती दिली. पुराव्यांसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही यावेळी ईडीकडून कऱण्यात आला.

पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांचा थेट हात असून प्रविण राऊत यांच्या माध्यमातून संजय राऊत यांनी पैसा मिळवला असल्याचा आरोप ईडीने केला होता. तसेच या प्रकरणात संजय राऊत यांनी दोन साक्षीदारांना धमकावल्याचं ईडीने न्यायालयाला सांगितलं होतं. संजय राऊत यांना जर सोडलं तर ते पुन्हा तशा प्रकारचं कृत्य करु शकतात, त्यामुळे त्यांना आठ दिवसांची रिमांड देण्यात यावी अशी मागणी ईडीकडून करण्यात आली होती. 

‘आर्थिक गुन्हे शाखेने २०२० मध्ये पत्रा चाळ प्रकरणाचा तपास सुरू केला. परंतु प्रवीण राऊत यांच्या विरोधात गेल्या वर्षी ईसीआयआर नोंदवण्यात आला आणि त्यांना यावर्षी जानेवारीमध्ये अटक करण्यात आली. असं असतानाही संजय राऊतांना आतापर्यंत अटक करण्यात आली नव्हती,’ असं निदर्शनास आणून दिलं.

संजय राऊतांना रात्री १२.३० वाजता अटक करत स्वातंत्र्यावर घाला घालण्यात आल्याचं यावेळी संजय राऊतांच्या वकिलांनी सांगितलं. तसंच संजय राऊतांना ह्रदयाचा त्रास असल्याचं त्यांनी सांगितलं. यावर ईडीने औषधं आणि घरचं जेवण देण्यास आपला विरोध नसल्याचं स्पष्ट केलं.

संजय राऊतांची रात्रीच्या वेळी चौकशी केली जाऊ नये अशीही विनंतीही करण्यात आली. यावर ईडीने सकाळी ८.३० ते ९.३० दरम्यान संजय राऊत वकिलांशी सल्लासमलत करु शकतात असं सांगितलं. तसंच रात्री १०.३० नंतर त्यांची चौकशी न करण्याची हमी दिली.



हेही वाचा

राज्यपालांच्या वक्तव्यावर पडदा टाकण्यासाठी संजय राऊतांविरोधात कारवाई : शिवसेना

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा