Advertisement

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार पूरग्रस्त भागाचा दौरा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पूरग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. येत्या बुधवारी आणि गुरुवारी म्हणजे २१-२२ ऑगस्टला उद्धव ठाकरे पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार पूरग्रस्त भागाचा दौरा
SHARES

महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली होती. महापूरामुळं घरातील सर्व जीवनाश्यक सामान पूराच्या पाण्यात वाहून गेलं आहे. त्यामुळं या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वच स्तरावरून मदत करण्यात येत आहे. असातच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पूरग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. येत्या बुधवारी आणि गुरुवारी म्हणजे २१-२२ ऑगस्टला उद्धव ठाकरे पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.

मदतकार्य हाती

पूरग्रस्त भागात मदतकार्य हाती घेण्याचं आवाहन केल्यानंतर मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणांहून शिवसेना आमदार,पदाधिकारी यापूर्वीच पूरग्रस्त भागांत मदतीसाठी दाखल झाले आहेत. तसंच, कोल्हापूर, सांगली भागातील पुराचं पाणी आता ओसरू लागलं आहे. त्यामुळं शिवसेना नेत्यांसह उद्धव ठाकरे या भागाचा दौरा करणार आहेत.

पदाधिकाऱ्यांसोबत दौरा

उद्धव ठाकरे यांच्यासोबत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, कोल्हापुरातील आमदार, खासदार, पदाधिकारी या वेळी उपस्थित राहणार आहेत. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मदतकार्यात उतरण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे नेते कामाला लागले होते.

पाहाणी दौरा

दरम्यान, याआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याचं म्हटलं होतं. शर्मिला ठाकरे या पूरग्रस्त भागाची पाहाणी करणार असून त्यांची मदत करणार होत्या. हेही वाचा -

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीचे प्रवेश शुक्रवारपासून होणार निश्चित

गणेशोत्सव २०१९: गणेश मंडळांसाठी समन्वय समितीची आचारसंहिताRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा