Advertisement

‘कराची स्वीट्स’वरून शिवसेनेतच दुमत!

वांद्र्यातील ‘कराची स्वीट्स’वरून शिवसेना नेते नितीन नांदगावकर आणि खासदार संजय राऊत यांची परस्पर मते समोर आल्याने कार्यकर्त्यांमधील गोंधळ वाढला आहे.

‘कराची स्वीट्स’वरून शिवसेनेतच दुमत!
SHARES

वांद्र्यातील ‘कराची स्वीट्स’वरून शिवसेना नेते नितीन नांदगावकर आणि खासदार संजय राऊत यांची परस्पर मते समोर आल्याने कार्यकर्त्यांमधील गोंधळ वाढला आहे. नितीन नांदगावकर यांनी ‘कराची’ या नावाला आक्षेप घेतला होता.

त्यानुसार काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे फायरब्रँड नेते नितीन नांदगावकर यांनी या दुकानाच्या मालकाला दुकानाच्या पाटीवरील कराची हे नाव काढून टाकायला सांगितलं होतं. त्यानंतर दुकानाच्या मालकाने हे नाव पेपरने झाकून घेतलं. या प्रकरणावर शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना विचारलं तेव्हा त्यांनी ‘कराची स्वीट्स’ बाबत कुठलाही आक्षेप नसल्याचं सांगितलं. 

हेही वाचा- कुणाच्या शंभर पिढ्या आल्या तरी, महापालिकेवरचा भगवा उतरणार नाही- संजय राऊत

एवढंच नाही, तर संजय राऊत यांनी कराची स्वीट्सचं समर्थन करताना सांगितलं की, कराची बेकरी आणि कराची स्वीट्सची मिठाई मुंबईत ६० सालापासून विकली जात आहे. त्यांचं पाकिस्तानसोबत काहीही देण-घेणं नाही. त्यामुळे केवळ कराची या नावाला आक्षेप असण्याचंही कारण नाही. शिवसेनेची ही अधिकृत भूमिका नसल्याचंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. 

नितीन राऊत यांनी एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला होता. या व्हिडिओत मुंबईमध्ये कराची हे नाव चालणार नाही, असा इशारा त्यांनी ‘कराची स्वीट्स’च्या मालकाला देत हे नाव हटवण्याची सूचना केली होती. या इशाऱ्याला घाबरून ‘कराची स्वीट्स’च्या मालकाने ताबडतोब दुकानाच्या नावाची पाटी कागदाने झाकून घेतली होती.

हेही वाचा- शिवसेना गद्दारी करून सत्तेत गेलीय, नारायण राणेंचा घणाघात

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा