Advertisement

कार्यकारणीतील बदलासाठी शिवसेनेची बैठकीआधी बैठक


कार्यकारणीतील बदलासाठी शिवसेनेची बैठकीआधी बैठक
SHARES

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक २३ जानेवारीला होत असून या बैठकीत संघटनात्मक बदलावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर सर्वच प्रमुख नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत नेत्यांना निवडीबाबत मार्गदर्शन करण्यात आल्याचं समजत आहे.


कुणाची कुठे वर्णी?

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत संघटनात्मक बदल निश्चित करण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना पक्षप्रमुख म्हणजे अध्यक्षपदी फेरनिवड होणार आहे. तर युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना बढती देण्यासंदर्भात विचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मनोहर जोशी, लीलाधर डाके, सुधीर जोशी यांच्या सारखे ज्येष्ठ नेते आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत काम करतील, अशी देखील माहिती आहे.

ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचं संघटन मजबूत करणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना आणि शिवसेनेच्या कोअर ग्रुपमध्ये काम करणारे विधान परिषद गटनेता अनिल परब शिवसेनेचे नेते म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे.



हेही वाचा-

शिवसेनेत बाळराजेंचं प्रमोशन?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा