Advertisement

शिवसेना आमदारांची पूरग्रस्तांसाठी मोठी घोषणा

मुसळधार पावसामुळं राज्याच्या अनेक भागांत पुरस्थिती निर्माण झाली आहे. पुरस्थितीमुळं अनेकांचं आर्थिक नुकसानं झालं आहे.

शिवसेना आमदारांची पूरग्रस्तांसाठी मोठी घोषणा
SHARES

मुसळधार पावसामुळं राज्याच्या अनेक भागांत पुरस्थिती निर्माण झाली आहे. पुरस्थितीमुळं अनेकांचं आर्थिक नुकसानं झालं आहे. त्यामुळं राज्यातून या पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला जात आहे. अशातच शिवसेनेनं आता मदतीचा हात पुढे केला असून, मातोश्रीवरून आदेश निघताच शिवसेनेच्या सर्व आमदारांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कंबर कसली आहे. त्यात एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्टातील विविध भागांत नुकत्याच आलेल्या पुरातील आपत्तीग्रस्तांसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून शिवसेनेचे सर्व मंत्री, राज्यमंत्री व विधानसभा आणि विधानपरिषद आमदारांचे एक महिन्याचे वेतन देण्यात येणार आहे, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेना विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी म्हटलं. मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे, असेही या दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

शिवसेना पक्ष सत्तेत असला आणि पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री असले तरी सरकारकडून होणाऱ्या मदतीव्यतिरिक्त पक्षपातळीवर मदतकार्याला सुरुवात करण्यात आली आहे. शिवसेनेचे अनेक नेते व पदाधिकारी पूरग्रस्त भागात मदत पोहचवण्यासाठी झटत आहेत. आदित्य ठाकरे आज चिपळूण दौऱ्यावर असून तिथेही त्यांनी हीच माहिती दिली. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर सरकारकडून योग्य अशी मदत पूरग्रस्तांना मिळणारच आहे पण दुसरीकडे शिवसेनेकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत. त्याचा आढावा घेण्यासाठीच मी येथे आलो आहे, असे आदित्य यांनी सांगितले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा