Advertisement

आदित्य ठाकरेंचा अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा

आमदार आदित्य ठाकरे यांनी नाव न घेता अमृता फडणवीस यांच्यावर टिका केली आहे.

आदित्य ठाकरेंचा अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा
SHARES

मागील काही दिवस माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेनेमध्ये ट्विटरवर चांगलीच जुंपली आहे.  अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टिका केल्यानंतर शिवसेनेनेही त्यांना चांगलंच प्रत्युतर दिलं. आता आमदार आदित्य ठाकरे यांनी नाव न घेता अमृता फडणवीस यांच्यावर टिका केली आहे. 

आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्या लोकांनी शब्द पाळला नाही, जे लोक सत्तेपासून दूर गेले आहेत, त्यांच्या मनातलं दु:ख मला कळतं. जनतेने आमच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. त्यामुळे टिका करणाऱ्यांवर शिवसैनिकांनी लक्ष देऊ नये. त्यांना काहीही करू द्या. काही ठिकाणी इंटरनेट बंद नाही. त्यामुळे त्यांना खुशाल ट्टिट करू द्या. 

अमृता फडणवीस यांच्या टीकेनंतर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलीस दलाची खाती अॅक्सिस बँकेतून वळवल्यानंतर आता ठाणे महानगरपालिकेनं अॅक्सिस बँकेतील खाती सरकारी बँकेमध्ये ताबडतोब वळवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे महापौर नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी तातडीची बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. या निर्णयाचा फटका अॅक्सिस बँकेला बसणार आहे. हेही वाचा -

राष्ट्रवादीला गृहमंत्रिपद दिल्यास मातोश्रीवर कॅमेरे लागतील - चंद्रकांत पाटील

विविध विषयांवर सेना नगरसेवकांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा