Advertisement

“यांचा लाडका पुत्र अर्णब गोस्वामीला घरातून उचलून आणल्यामुळेच…”

सचिन वाझेंनी यांचा लाडका पुत्र अर्णब गोस्वामीला घरातून उचलून आणल्याचं दु:ख त्यांना झालं आहे, असा आरोप शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी करताच सभागृहात प्रचंड गदारोळ झाला.

“यांचा लाडका पुत्र अर्णब गोस्वामीला घरातून उचलून आणल्यामुळेच…”
SHARES

मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं, ही मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमकपणे लावून धरली. त्यातच सचिन वाझेंनी यांचा लाडका पुत्र अर्णब गोस्वामीला घरातून उचलून आणल्याचं दु:ख त्यांना झालं आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबल्याचा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) आणि शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी करताच सभागृहात प्रचंड गदारोळ झाला.   

देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देताना भास्कर जाधव म्हणाले, २०१८ मध्ये अन्वय नाईक आणि त्यांच्या आईने सुसाइड नोट लिहून आत्महत्या केली. पण तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी हे प्रकरण दाबून टाकलं. त्यानंतर हे प्रकरण या सरकारकडे आल्यावर अन्वय नाईक यांच्या पत्नीने मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पत्र लिहून माझ्या पती व सासूने आत्महत्या केली. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण दाबल्याचा आरोप केला. त्यानंतर गृहमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली. ही चौकशी सचिन वाझे करत होते. सचिन वाझेंकडे ही चौकशी राहू नये, नाहीतर माजी मुख्यमंत्री अडचणीत येतील. म्हणून सचिन वाझेला टार्गेट केलं जात आहे, असा दावा भास्कर जाधव यांनी केला.

हेही वाचा- मनसुख हिरेन यांची हत्याच, देवेंद्र फडणवीसांनी थेट जबाबच वाचून दाखवला

यांचा लाडका पुत्र अर्णब गोस्वामीला सचिन वाझेंनी घरातून उचलून आणलं म्हणून यांना दु:ख झालेलं आहे. त्याचबरोबर जस्टीस लोढा यांची नागपूरमध्ये हत्या झाली. ती हत्या का झाली हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे. सचिन वाझे जर तपास अधिकारी असतील, तर यांचं बिंग फुटेल. यांना बेड्या पडतील. म्हणून ते सचिन वाझेंच्या मागे लागले आहेत. म्हणून माझी सरकारला विनंती आहे की सरकारने सचिन वाझे यांना त्यांच्या पदावर कायम ठेवावं, अशी मागणी देखील भास्कर जाधव यांनी केली. 

तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी “अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी त्यांची पत्नी यशदा नाईक आणि मुलगी आज्ञा नाईक यांनी तक्रार दिली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी अन्वय नाईक आत्महत्येचं प्रकरण दाबलं. त्याची आम्हाला चौकशी करायची आहे.” असं म्हणत इशारा दिला.

त्याआधी, मनसुख हिरेन याने आत्महत्या केली नसून त्यांची हत्याच झाली आहे. त्यानंतर त्यांचा मृतदेह खाडीत फेकून देण्यात आला. त्यांचा खून पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनीच केला असल्याचा संशय त्यांच्या पत्नीने FIR मध्ये व्यक्त केला आहे. त्यामुळे सचिन वाझे यांना कोण आणि कशासाठी त्यांना वाचवित आहे? याचा खुलासा होणं गरजेचं असून वाझे यांना तत्काळ अटक झाली पाहिजे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

(shiv sena mla bhaskar jadhav criticised devendra fadnavis on anvay naik suicide case)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा