Advertisement

एवढे मोठे खिळे चीनच्या सीमेवर लावले असते तर.. संजय राऊतांची केंद्रावर टीका

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या इतर खासदारांसोबत मंगळवारी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली.

एवढे मोठे खिळे चीनच्या सीमेवर लावले असते तर.. संजय राऊतांची केंद्रावर टीका
SHARES

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या इतर खासदारांसोबत मंगळवारी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी शेतकऱ्यांची विचारपूस करताना केंद्र सरकारच्या दडपशाहीवर खरपूस टीका केली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर आपण आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचं संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून आधीच जाहीर केलं होतं. त्यानुसार त्यांनी गाझीपूर सीमेवर जाऊन शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना (shiv sena) खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, अनिल परब इ. खासदार देखील उपस्थित होते. 

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांना आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेण्याचे निर्देश दिले होते. केंद्र सरकारकडून आंदोनकर्त्यांना शेतकऱ्यांवर ज्या प्रकारे दबाव टाकला जात आहे, अन्याय केला जात आहे, अशा परिस्थितीत त्यांच्या पाठीशी उभं राहणं, त्यांना पाठबळ देणं हे आपलं कर्तव्य आहे, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यानुसार उद्धव ठाकरे यांचा निरोप, संवेदना घेऊन आपण इथं पोहोचलो आहेत.

हेही वाचा- मनसेच्या बालेकिल्ल्यात नव्या शिलेदाराची निवड

राकेश टिकैत यांच्यासोबत आम्ही दूरध्वनीवरुन बोललो होतो. पण फोनवरुन बोलणं वेगळं आणि प्रत्यक्षात मैदानात येऊन पाठिंबा देणं हे वेगळं आहे. यामुळे प्रत्यक्ष रणभूमीवर येऊन आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. एवढंच नाही, तर शेती कायद्याचा विरोध करणाऱ्या देशातील प्रत्येक राजकीय पक्षाने इथं येऊन आपल्या भावना व्यक्त करणं हे त्यांचं कर्तव्य आहे, असं मतही संजय राऊत (sanjay raut) यांनी यावेळी व्यक्त केलं. 

केंद्र सरकारने ज्या प्रकारे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर कारवाई केली, त्यावरून विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. याबाबत विचारलं असता, तिकरी सीमेवर जेवढे मोठे खिळे आणि भींत लावण्यात आली आहे, तेवढे चीनच्या सीमेवर लावले असते तर चिनी सैन्य २० किमी आत घुसलं नसतं, अशा शब्दांत संजय राऊत यांनी केंद्र सरकारला टोला हाणला.

(shiv sena mp sanjay raut meets protesters farmers at delhi)


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा