Advertisement

राज्यपालांना दिलेलं उत्तर हा तर ऐतिहासिक दस्तावेज- संजय राऊत

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या इंग्रजी पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परखड अशा मराठी ठाकरी भाषेत दिलेलं उत्तर हा एक ऐतिहासिक दस्तावेज आहे.

राज्यपालांना दिलेलं उत्तर हा तर ऐतिहासिक दस्तावेज- संजय राऊत
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या इंग्रजी पत्राला परखड अशा मराठी ठाकरी भाषेत दिलेलं उत्तर हा एक ऐतिहासिक दस्तावेज असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली. शिवाय राज्यपाल हे आम्हाला आदरणीय असल्याचा टोमणाही अप्रत्यक्ष लगावला. (shiv sena mp sanjay raut reaction on uddhav thackeray letter on hindutva and governor bhagat singh koshyari)

मुंबईतील प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या इंग्रजी पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परखड अशा मराठी ठाकरी भाषेत दिलेलं उत्तर हा एक ऐतिहासिक दस्तावेज आहे. मुख्यमंत्र्यांच्या कामात हस्तक्षेप करणाऱ्या राजभवनाला-राज्यपालांना कुठलंही आकांडतांडव न करता अगदी सुस्पष्ट आणि विनम्र भाषेत कसं उत्तर द्यावं, त्याचा आदर्श असा परिपाठ मुख्यमंत्र्यांनी अत्यंत शालीनतेने हिंदुत्वाच्या, घटनेच्या सर्व मर्यादा पाळून घालून दिलेला आहे. त्यावर आता फार चर्चा होऊ नये. राज्यपाल हे आदरणीय व्यक्ती आहेत. त्यांच्याविषयी आमच्या मनात सन्मानाची भावना आहे, संजय राऊत यांनी सांगितलं.

हेही वाचा - जनतेच्या श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणं सरकारचं प्रथम कर्तव्य; राज्यपालांना मुख्यमंत्र्यांचं चोख उत्तर

दरम्यान, राज्यपालांनी पाठवलेल्या पत्राला मुख्यमंत्र्यांनही उत्तर देणारं पत्र पाठवलं आहे. या पत्रात मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्वावरून भाजपचा अप्रत्यक्षरित्या खरपूस समाचार घेतला आहे. हे पत्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. 

या पत्रात महोदय, आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे, तो योग्यच आहे. मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही तसंच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचं हसतखेळत घरात स्वागत करणं हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही.

Have you suddenly turned ‘secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळं उघडणं म्हणजे हिंदुत्व आणि नउघडणं म्हणजे ‘secular’ असं आपलं म्हणणं आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत, त्या घटनेचा महत्त्वाचा गाभा ‘secularism’ आहे. तो आपल्याला मान्य नाही का? असं नमूद करत उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा