Advertisement

हा तर लोकशाहीवरील सामूहिक बलात्कार, संजय राऊत संतापले

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशातील पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीचा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी अत्यंत तिखट शब्दांत निषेध केला आहे.

हा तर लोकशाहीवरील सामूहिक बलात्कार, संजय राऊत संतापले
SHARES

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशातील पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीचा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी अत्यंत तिखट शब्दांत निषेध केला आहे. हा प्रकार म्हणजे लोकशाहीवरील सामूहिक बलात्कार आहे, असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. (shiv sena mp sanjay raut reacts on hathras gang rape and clash between rahul gandhi and up police)

या प्रकरणावर मुंबईतील प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधी खासदार आहेत. सोबतच माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे नातू तसंच राजीव गांधींचे पुत्र आहेत. या दोघांनीही देशासाठी बलिदान दिलं आहे. रक्त सांडलं आहे. याचा विसर जर कोणाला पडला असेल तर इतिहास त्यांना माफ करणार नाही.

हेही वाचा - हाथरस घटनेवर 'ते' गप्प का? राज ठाकरेंचा रोकठोक सवाल

उत्तर प्रदेशचे पोलीस राहुल गांधींसोबत ज्याप्रकारे वागत होते, त्यांची कॉलर पकडली, धक्काबुक्की केली, जमिनीवर पाडलं हे चित्र कोणत्याही सुसंस्कृत समाजाला आणि राजकारणाला शोभा देणारं नाही. विरोधी पक्षाने राज्यातील एका मुलीवर बलात्कार झाला, खून झाला त्याबद्दल आवाज उठवायचा नाही? ही कुठली लोकशाही? आवाज उठवणाऱ्या राहुल गांधींसारख्या नेत्यांना खाली पाडत असाल तर मी म्हणेन या देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा हा सामूहिक बलात्कार आहे, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला.

साधारण दोन आठवड्यापूर्वी उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये १९ वर्षीय तरुणीवर सवर्ण समाजातील चार जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. एवढंच नाही, तर बलात्कारानंतर या तरुणीची जीभ कापून, तिची मान मोडण्याचं अमानुष कृत्य देखील त्यांनी केलं होतं. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात पीडित तरूणीवर उपचार सुरु होते. दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. त्यानंतर यूपी पोलिसांनी तिच्या कुटुंबियांच्या अनुपस्थितीत तरूणीवर रातोरात अंत्यसंस्कार केले. या घटनेवरून देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला जात आहे. 

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे गुरूवारी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पायी जात असताना पोलिसांनी त्यांना अडवलं. त्यावेळी त्यांना धक्काबुक्की झाली. त्यावरून आता राजकारण तापलं आहे. 


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा