Advertisement

दिंडोशीत विकासकामांच्या प्रचाराचा नारळ फुटला


दिंडोशीत विकासकामांच्या प्रचाराचा नारळ फुटला
SHARES
Advertisement

दिंडोशी – आगामी महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच दिंडोशी मतदारसंघात शिवसेनेनं अनेक विकासकामांच्या प्रचारांचा नारळ वाढण्यास सुरुवात केली आहे. दिंडोशीत बुधवारी रात्री दोन रस्त्यांच्या कामाचं भूमिपूजन दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच उर्वरित 9 अंतर्गत रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन येत्या दिवाळीपूर्वी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या वेळी युवा सेना सरचिटणीस अमोल कीर्तीकर, आरोग्य समिती अध्यक्ष प्रशांत कदम, नगरसेविका सायली वारिसे, माजी नगरसेवक गणपत वारिसे, शाखाप्रमुख भाई परब, विभाग क्र. तीनचे विद्यार्थी सेनेचे निमंत्रक विजय गावडे, युवा सेनेचे रुपेश कदम तसंच शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित विषय
Advertisement