Advertisement

जिलेबी-फाफडानंतर आता शिवसेनेचं मुंबईत ‘रासगरबा’

'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा' अशी टॅगलाईन वापरत जोगेश्वरीत भव्य गुजराती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. हा मेळावा यशस्वी झाल्यानंतर आता मालाडमध्ये देखील आणखी एका मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे.

जिलेबी-फाफडानंतर आता शिवसेनेचं मुंबईत ‘रासगरबा’
SHARES

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं गुजराती, मारवाडी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मेळाव्यांचा धडाका लावला आहे. जोगेश्वरीतील मेळावा यशस्वी झाल्यानंतर आता येत्या ७ फेब्रुवारीला शिवसेनेनं (shiv sena) मालाडमध्ये पुन्हा एकदा मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात २१ गुजराती उद्योजक, व्यापारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सोबत शिवसेना गुजरातीबहुल परिसरात रासगरब्याचंही आयोजन करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

पुढच्या काही महिन्यांत राज्यातील १० महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या सगळ्यात मुंबई महानगरपालिकेची (bmc) निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. मुंबई महानगरपालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे शिवसेनेने मुंबई राखण्यासाठी मराठी भाषिक मतदारांसोबतच गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी खास रणनिती आखली आहे.

हेही वाचा- हिंदू समाजाला सडका बोलणाऱ्या सरजीलला अटक करा, नाहीतर... : फडणवीस

शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर मुंबईतील (mumbai) गुजराती मतदारांना शिवसेनेकडे वळवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यानुसार  'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा' अशी टॅगलाईन वापरत जोगेश्वरीत भव्य गुजराती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ओशिवरामधील गुजरात भवनातील नवनीत हॉलमध्ये शिवसेनेनं मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला १०० गुजराती व्यापारी उपस्थित होते.

हा मेळावा यशस्वी झाल्यानंतर आता मालाडमध्ये देखील आणखी एका मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे. ७ फेब्रुवारीला या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात गुजराती उद्योजक, व्यापारी हाती शिवबंधन बांधतील. एवढंच नाही, तर गुजरातीबहुल भागांमध्ये शिवसेना रासगरबादेखील आयोजित करणार आहे. 

पश्चिम उपनगरातील अंधेरीपासून पुढे गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली आणि दहिसर भागात गुजराती-मारवाडी भाषिकांची संख्या मोठी आहे. यामुळे या मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेने या भागाकडे लक्ष केंद्रीत केलं आहे.

(shiv sena organising another seminar for gujrati voters in malad mumbai ahead of bmc election 2021)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा