Advertisement

परिचारक निलंबनावरून शिवसेना आक्रमक


परिचारक निलंबनावरून शिवसेना आक्रमक
SHARES

सोमवारी सकाळी गोंधळामुळे विधानसभेचं कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आलं. जवानांचा अपमान करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारकांना परत निलंबित करता येत नसेल तर त्यांना बडतर्फ करा आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेत गोंधळ घातला. या गोंधळामुळे विधानसभेचं कामकाज पहिल्यांदा १५ मिनिटांसाठी तहकूब झालं. त्यानंतर अर्ध्या तासासाठी विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं.


'हे शक्य नाही'

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला सुरुवात होताच विधानसभेत प्रशांत परिचारक यांचं पुन्हा निलंबन करण्यासाठी शिवसेनेने गोंधळ घातला. मात्र आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे घेण्याचा निर्णय उच्चस्तरीय समितीने एकमताने घेतला होता. या समितीमध्ये शिवसेनेच्या आमदार निलम गोऱ्हे या देखील होत्या. निलंबन मागे घेण्याचा ठराव विधान परिषदेत एकमताने मंजूर झाला आहे. हा विधान परिषदेतील विषय आहे तो विधानसभेत आणण्याची गरज नाही. एकदा ठराव मंजूर झाला की तो परत वर्षभर आणता येत नाही, त्यामुळे निलंबन मागे घेता येणं शक्य नाही, असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. मात्र शिवसेना आमदार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.


प्रशांत परिचारक यांना निलंबित करता येत नसेल तर त्यांना बडतर्फ करा. देशातील सैनिकांच्या पत्नींचा अपमान केला आहे. जवानांचा अपमान करणाऱ्या परिचारकांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.
- सुनील प्रभू , प्रवक्ता व प्रतोद शिवसेना

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा