भाजपाची मते स्वत:कडे वळवण्याचा शिवसेनेचा डाव

  Mulund
  भाजपाची मते स्वत:कडे वळवण्याचा शिवसेनेचा डाव
  मुंबई  -  

  मुलुंड - महापालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसे राजकीय डावपेचांना वेग येत आहेत. मुलुंडमध्ये भाजपाचे खासदार किरीट सोमय्या आणि भाजपा आमदार सरदार तारासिंह यांच्यातील दूरावा स्पष्टपणे समोर आलेला आहे. त्यामुळे याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात असल्याचं दिसते आहे.

  बुधवारी मुलुंडमध्ये शिवसेनेचे उमेदवार मनोज कारिया यांनी भाजपा आमदार सरदार तारासिंह यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. शिवसेनेकडून झालेल्या या कृतीमुळे हा चर्चेचा विषय बनला होता. मात्र, यावर प्रतिक्रिया देताना ‘मी अजूनही भाजपाचाच कार्यकर्ता आहे’ असं तारासिंह यांनी सांगितलं. तर शिवसेनेचे उमेदवार मनोज कारिया यांनी 'ही भेट सदिच्छा भेट असून तारासिंग आम्हाला वरिष्ठ आहेत, तेव्हा आशिर्वाद घेण्यासाठी भेटलो' अशी माहिती दिली आहे. कारिया असे सांगत असले तरी शिवसेना, भाजपा स्वबळावर लढत असताना शिवसेनेचा उमेदवार भाजपाच्या आमदाराची भेट घेतो,  हे तसे कोणलाही पटणारे वाटत नाही. शिवसेनेचे इरादे यातून स्पष्ट दिसत आहेत. तारासिंह यांचा स्वपक्षावरच असलेल्या नाराजीचा फायदा घेत त्यांच्यासोबत असलेली भाजपाची मते स्वत:कडे वळवण्याचा डाव शिवसेनेकडून आखला जात आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.