Advertisement

शिवसेनेला हवं रेल्वे मंत्रालय?, राज्यातील 'या' खासदारांना मिळणार मंत्रीपद

यंदा मोदी मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील ७ खासदारांचा समावेश असून त्यात शिवसेनेचे अरविंद सावंत यांचं देखील नाव आहे. शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रिपद मिळत असलं, तरी हे मंत्रिपद रेल्वे मंत्रालयाच्या स्वरूपात मिळावं, अशी शिवसेनेची इच्छा असल्या

शिवसेनेला हवं रेल्वे मंत्रालय?, राज्यातील 'या' खासदारांना मिळणार मंत्रीपद
SHARES

राष्ट्रपती भवनासमोरी पटांगणात गुरूवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शानदार शपथविधी साेहळा होत आहे. मोंदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ मोदी सरकारमधील इतर मंत्रीही शपथ घेणार आहेत. यंदा मोदी मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील ७ खासदारांचा समावेश असून त्यात शिवसेनेचे अरविंद सावंत यांचं देखील नाव आहे. सावंत यांच्या रुपाने शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रिपद मिळत असलं, तरी हे मंत्रिपद रेल्वे मंत्रालयाच्या स्वरूपात मिळावं, अशी शिवसेनेची इच्छा असल्याचं समजत आहे. 

हवंय महत्त्वाचं मंत्रालय 

नरेंद्र मोदी यांच्या आधीच्या मंत्रीमंडळात अनंत गीते शिवसेनेचे एकमेव कॅबिनेट मंत्री होते. गीते यांच्याकडे अवजड मंत्रालय होतं. परंतु रायगडमधून लोकसभा निवडणूक लढवणारे गीते राष्ट्रवादीचे सुनील प्रभू यांच्याकडून पराभूत झाल्याने केंद्रात पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे नव्या सरकारमध्ये सावंत गीते यांची जागा घेणार आहेत. अवजड मंत्रालय इतर मंत्रालयाच्या तुलनेत कमी महत्त्वाचं असल्याने गीते हे मंत्रालय सांभाळताना नाराजच होते. त्यामुळे यंदा आपल्या वाट्याला चांगलं मंत्रायल यावं अशी शिवसेनेची इच्छा आहे. त्यातूनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रेल्वे मंत्रालयाची मागणी केल्याची चर्चा आहे. 

'यांना' मिळणार मंत्रीपद

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी सुमारे दीड तास चर्चा करून मंत्र्यांची नावे निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शपथविधीआधी मोदींनी सर्व भावी मंत्र्यांना भेटीसाठी बोलावलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ७ खासदारांना पंतप्रधान कार्यालयातून फोन गेल्याचं म्हटलं जात आहेत. यामध्ये सावंत यांच्यासोबत, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, अकोल्याचे खा. संजय धोत्रे, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री पियुष गोयल, मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर, सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचा समावेश असेल.    

गेल्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला भूपृष्ठ वहन, जहाजबांधणी, संरक्षण (राज्यमंत्री), रेल्वे, मनुष्यबळ विकास, नागरी हवाई उड्डाण, सामाजिक न्याय (राज्यमंत्री) अशी महत्त्वाची खाती आली होती. यंदा कुठली खाती येणार याविषयी उत्सुकता आहे.



हेही वाचा-

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत घेणार मंत्रीपदाची शपथ

ठाकरे ठाकरेंच्या भेटीला, काँग्रेसचा सूर नरमला?



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा