Advertisement

ठाकरे ठाकरेंच्या भेटीला, काँग्रेसचा सूर नरमला?

काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी गुरूवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही असं माणिकराव ठाकरे सांगत आहेत.

ठाकरे ठाकरेंच्या भेटीला, काँग्रेसचा सूर नरमला?
SHARES

काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी गुरूवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही असं माणिकराव ठाकरे सांगत असले, तरी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांमध्ये महाआघाडीबाबत नक्कीच चर्चा झाली असावी, असा अंदाज लावण्यात येत आहे.  

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दणदणीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी अवघी १ जागा जिंकण्याची नामुश्की काँग्रेवर आली. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीतही अशीच गत होऊ नये म्हणून काँग्रेसने जुळवा जुळव करायला सुरूवात केली आहे.  

आधी मोडता

याआधी राष्ट्रवादीच्या मध्यस्तीने मनसेला महाआघाडीत सामील करून घेण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु काँग्रेसने मध्येच मोडता घातल्याने ही महाआघाडी होऊ शकली नव्हती. तरीही राज ठाकरे यांनी काँग्रेस उमेदवार उभे असलेल्या मतदारसंघात जाऊन शहा तसंच मोदींविरोधात प्रचार केला होता.  

तरीही प्रचार

भलेही मोदी लाटेत राज यांनी घेतलेल्या सभांचं मतांमध्ये परिवर्तन होऊ शकलं नाही, तरी राज यांच्या भाषणांनी शिवसेना-भाजपा युतीला काही काळ घाम फोडला होता. काँग्रेस नाही, तर मनसेच मुख्य विरोधक असल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांसहीत युतीतील नेतेही राज यांच्यावर पलटवार करत होते.  

त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मवाळ भूमिका घेतल्याचं दिसत असून मनसेला महाआघाडीत सामील करण्याविषयी हालचाली सुरू झाल्याचंच या भेटीवरून दिसत आहे.   



हेही वाचा-

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत घेणार मंत्रीपदाची शपथ

महाआघाडीची तयारी? राज ठाकरे, शरद पवार यांच्यात ४५ मिनिटे गुफ्तगू



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा