Advertisement

बिहार निवडणुकीत शिवसेनेचे ‘इतके’ उमेदवार, 'ठाकरी' तोफही धडाडणार!

सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजपला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेकडून रणनिती आखण्यात येत असून २० स्टार प्रचारक बिहारच्या रणभूमीत शिवसेनेच्या प्रचाराचा भार सांभाळणार आहेत.

बिहार निवडणुकीत शिवसेनेचे ‘इतके’ उमेदवार, 'ठाकरी' तोफही धडाडणार!
SHARES

बिहारमध्ये होणारी विधानसभा निवडणूक शिवसेना ताकदीनं लढवणार असून पक्षाकडून एकूण ५० उमेदवार रिंगणात उतरवण्यात येणार आहेत. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजपला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेकडून रणनिती आखण्यात येत असून २० स्टार प्रचारक बिहारच्या रणभूमीत शिवसेनेच्या प्रचाराचा भार सांभाळणार आहेत. (shiv sena will contest bihar assembly election 2020 along with 20 star campaigners)

महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती तुटल्यापासून दोन्ही पक्षांमधून सध्या विस्तवही जात नाही, अशी परिस्थिती आहे. वेगवेगळ्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये सातत्याने चकमकी उडत असताना अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या तपासावरून संशयाचं वादळ निर्माण करत भाजपने महाराष्ट्र सरकार खासकरून शिवसेनेला नामोहरम करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. एवढंच कमी की काय शिवसेनेच्या युवा नेत्याला अडकवण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. यांत त्यांना बिहार सरकारची चांगली साथ मिळाली.

एकूणच मुंबई पोलिसांची बदनामी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर आघात करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणुकीत किमान ५० जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांच्या जनता दलाने शिवसेनेच्या धनुष्यबाणाला आक्षेप घेतल्याने धनुष्यबाणाऐवजी मिळेल ते निवडणूक चिन्ह घेऊन लढण्याची तयारी शिवसेनेने दाखवली आहे. या निवडणुकीत बेरोजगारी, शिक्षण, उद्योगधंदे या प्रश्नांवर सरकारला घेरतानाच सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनी बिहारच्या जनतेला कसं भरकटवलं हा देखील शिवसेनेचा प्रचारातील प्रमुख मुद्दा असणार आहे.

हेही वाचा - हाथरस घटनेवरून शिवसेना आक्रमक, राष्ट्रपतींना पत्र लिहून केल्या ‘या’ ६ मागण्या

सन २०१५ मधील बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने २४३ जागांपैकी ८० जागा लढवल्या होत्या. त्यात शिवसेनेला २ लाख ११ हजार १३१ मते मिळाली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसला १ लाख ८५ हजार ४३७ आणि एमआयएमला ८० हजार २४८ मते मिळाली होती. म्हणजेच या दोन्ही पक्षांपेक्षा शिवसेनेला जास्त मतं मिळाली होती. हयाघाट, बोचहा, दिनारा जमालपूर, कुम्हरार, पटनासाहिब आणि मोरवा अशा ७ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची, भमुआ आणि मनिहारी या २ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती. एवढंच नाही, तर एकूण ३५ जागांवर शिवसेनेला भाजपपेक्षाही जास्त मते मिळाली होती. यापैकी ३ जागांवर शिवसेनेने घेतलेल्या निर्णायक मतांमुळे भाजपच्या उमेदवाराला पराभवाची धूळ चाखावी लागली होती. 

निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेनेने २० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत सुभाष देसाई, संजय राऊत व चंद्रकांत खैरे या नेत्यांचाही समावेश आहे. याशिवाय, अनिल देसाई, अरविंद सावंत, विनायक राऊत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफना, प्रियांका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, सुनील चिटणीस, योजराज शर्मा, कौशलेंद्र शर्मा, विनय शुक्ला, गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी, अशोक तिवारी यांचा स्टार प्रचारकांमध्ये समावेश असणार आहे.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा