संध्या दोशी पुन्हा दोषी?

चारकोप - जिंकण्यासाठी कायपन असं म्हणण्याची वेळ सध्या आली आहे. मतदारांना खूश करण्याचा उमेदवार शक्य ते सर्व मार्ग वापरताना दिसत आहेत. त्याचाच प्रत्यय सोमवारी चारकोपमध्ये आला. राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या आणि प्रभाग क्रमांक 18 च्या शिवसेना उमेदवार संध्या विपुल दोशी यांच्या दोन कार्यकर्त्यांना साड्या वाटप करताना ताब्यात घेण्यात आले आहे. सेक्टर 3 प्रभागात मतदारांना साड्या वाटप करत असताना या महिलांना भरारी पथकाने अटक केली. याविषयी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Loading Comments