मुंबई - शिवसेनेनं 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा वापरासाठी 30 डिसेंबर 2016 पर्यंत मुदत वाढवावी अशी मागणी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहुन केली आहे. याशिवाय सार्वजनिक वाहतूक आणि अन्य अत्यावश्यक ठिकाणी या नोटांचा वापर 30 डिसेंबरपर्यंत करू द्यावा असं पत्रात म्हटलंय. 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर बँका आणि एटीएम केंद्रावर नागरिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली आहे.