Advertisement

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क सज्ज


दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क सज्ज
SHARES

शिवाजी पार्क – विजया दशमीला होणारा दसरा मेळावा ही प्रत्येक शिवसैनिकासाठी जिव्हाळ्याची बाब. दरवर्षी हजारो शिवसैनिक शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यात विचारांचं सोनं लुटण्य़ासाठी येतात. मंगळवारी होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क सज्ज झाले असून, मेळाव्याच्या तयारीवर अंतिम हात फिरवण्यात येत आहे.
गेल्या आठवड्यापर्यंत मुंबईत होत असलेल्या पावसामुळे दसरा मेळाव्यावर अनिच्छिततेचे सावट पसरले होते. मात्र पावसाने मोकळीक घेतल्यानंतर शिवसेनेने दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू केली होती. रविवारपासून सुरु असलेल्या या तयारीला सोमवारी सायंकाळी अधिकच वेग आला. सोमवारी सायंकाळी स्टेज बांधणी तसेच इतर व्यवस्थापनाच्या सोईसुविधांची लगबग शिवाजी पार्क मध्ये पहायला मिळत होती.
तसेच दादर परिसरात होर्डिंगमधून दसरा मेळाव्याची वातावरणनिर्मिती करण्यात येत आहे. `पुन्हा गाजवू दाही दिशा अन् पुन्हा वाढवू शान, पुन्हा आणूनि भगवा वाढवू दादरचा अभिमान’ अशा काव्यपंक्ती, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेले फलक दादर परिसरात लागलेले दिसून येत आहेत. मात्र शिवाजी पार्क हे शांतता क्षेत्र असल्यामुळे इथे एका मर्यादेपर्यंतच आवाजाला परवानगी आहे. हे सर्व नियम या मेळाव्यात पाळले जाणार का हे पाहणे अधिक औत्सुक्याचे आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा