Advertisement

शिवसेनेने केली ड्राय डेची मागणी


शिवसेनेने केली ड्राय डेची मागणी
SHARES

मुंबई - चैत्यभूमीच्या विकासकामांवरून आता शिवसेनेने राजकारण खेळण्यास सुरुवात केली असून, चैत्यभूमीच्या सुशोभिकरणाचा विकास हा शिवसेनेने केल्याचा दावा सभागृहनेते यशवंत जाधव यांनी केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमी समन्वय समितीची बैठक बोलावल्यामुळे शिवसेनेला पोटशूळ उठला असून, ही बैठक कशासाठी बोलावली? याची माहिती नसताना महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि यशवंत जाधव यांनी मुख्यमंत्र्यांचा निषेध व्यक्त करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिन आणि जयंतीदिनी ड्राय डे घोषित करण्याची मागणी केली.

20 मार्च 1927 साली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडमधील चवदार तळ्याचा सत्याग्रह करत दलितांसाठी ते खुले करून दिले. याला सोमवारी 90 वर्षे पूर्ण झाली असून, त्या निमित्त दलित नेते महाडला चवदार तळ्याच्या ठिकाणी त्यांना विनम्र अभिवादन करण्यास गेलेले असताना, मुख्यमंत्र्यांनी चैत्यभूमी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. परंतु या बैठकीला महापौरांना बोलावण्यात आले नाही. चैत्यभूमी समन्वय समितीच्या माध्यमातून महापालिकेच्या वतीने महापरिनिर्वाणदिन आणि जयंतीदिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु या बैठकीला महापौरांसह दलित नेत्यांना न बोलावल्यामुळे आपण याचा निषेध व्यक्त करत असल्याचे सभागृहनेते यशवंत जाधव यांनी सांगितले. मात्र, ही बैठक किती वाजता आहे? त्यात कोणते विषय आहेत? याची माहिती नसताना यशवंत जाधव यांनी निषेधाचा सूर आळवत महापालिकेने केलेली चैत्यभूमीवरील विकास कामे ही शिवसेनेने केली असल्याचे छातीठोकपणे सांगितले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा