राष्ट्रपती उमेदवाराबद्दल येत्या दोन दिवसांत शिवसेना भूमिका स्पष्ट करणार - राऊत

  Mumbai
  राष्ट्रपती उमेदवाराबद्दल येत्या दोन दिवसांत शिवसेना भूमिका स्पष्ट करणार - राऊत
  मुंबई  -  

  राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारासाठी शिवसेनेची भूमिका अजूनही निश्चित झालेली नाही, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमवारी मांडले. शिवसेनेची भूमिका अजून निश्चित नसली, तरी अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना फोन करुन माहिती दिली आहे. त्यावेळी त्यांनी पाठिंबा मागितला आहे. येत्या दोन दिवसांत शिवसेना आपली भूमिका स्पष्ट करेल. रामनाथ कोविंद यांच्या नावावर अजून शिवसेनेकडून कोणताही निर्णय झालेला नाही. शाह यांनी कोविंद यांच्याबद्दल समर्थन मागितले आहे.


  हेही वाचा - 

  'राष्ट्रपतीपदाच्या निवडीबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील'

  ...तर राष्ट्रपतिपदासाठी स्वामीनाथन यांच्या नावाला शिवसेनेची पसंती


  आम्ही 2-3 दिवसांत या विषयावर बोलण्याकरता पक्षातील नेत्यांची बैठक घेणार आहोत. कोविंद यांच्या उमेदवारीवर निर्णय झालेला नाही. भागवत, स्वामिनाथन यांचे नाव आम्ही सांगितल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिवसेना राष्ट्रीय हित पाहूनच निर्णय घेणार आहे. शिवसेना नेत्यांशी बोलून निर्णय घेणार आहे. आम्ही दोन नावे दिली होती, असेही राऊत यांनी यावेळी सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.