Advertisement

"हा नालायक आणि बेशरमपणा", संजय राऊत संतप्त

शिवसेना खासदार संजय राऊत शाहरुखला ट्रोल करणाऱ्यांवर चांगलेच संतापले आहेत.

"हा नालायक आणि बेशरमपणा", संजय राऊत संतप्त
SHARES

गानसम्राज्ञी स्वर्गीय भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी संध्याकाळी त्यांच्यांवर मुंबईतील शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी अनेक बडे नेते आणि सेलिब्रिटींची उपस्थिती होती. यावेळी शाहरुख खान देखील उपस्थित होता. त्यानं देखील दीदींना श्रद्धांजली वाहिली. यानंतर श्रद्धांजली वाहताना तो थुंकला असा दावा करत त्याच्यावर कठोर शब्दात टीका केली जात आहे.

यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ते म्हणाले की, 'हे लोक कोण आहेत. त्यांना थोडी देखील लाज नाही. अशा वेळीही हे लोक धर्म जातीचे राजकारण करत आहे. ज्या पद्धतीने शाहरुख खानला ट्रोल करण्यात येतेय ते अत्यंत चुकीचे आहे. शाहरुख दुवा मागत होता. एका कुटुंबातील, गटातील लोक त्यांना ट्रोल करताना दिसत आहेत. हा काय प्रकार आहे, हा नालायक आणि बेशरमपणा आहे. एका महान कलाकाराला ट्रोल करत आहात. धर्म जात पंथ द्वेष यापलिकडे तुम्हाला काही सूचत नाही? तुम्ही देशाची वाट लावली आहे.' अशा शब्दात संजय राऊतांनी आपला संताप व्यक्त केला.

लता मंगेशकर यांच्यासाठी प्रार्थना करतानाचा शाहरुख खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाहरुख खानच्या हातात फुलांचा हार असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे.

शाहरुख प्रथम लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर फुलांचा हार अर्पण करतो आणि नंतर लतादीदींच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करतो आणि त्यांच्यावर फुंकर घालतानाही दिसत आहे. मात्र काही लोकांनी शाहरुख खानच्या फुंकर मारण्याच्या क्रियेला थुंकला असं म्हणत आहेत.हेही वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 'या' नेत्यांनी वाहिली लता मंगेशकरांना श्रद्धांजली

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा