उत्तर मुंबईत तिघींना शिवसेनेत आल्याचा फायदा

  Mumbai
  उत्तर मुंबईत तिघींना शिवसेनेत आल्याचा फायदा
  मुंबई  -  

  मुंबई- उत्तर मुंबईमध्ये शिवसेनेने इतर पक्षांमधून आलेल्या चार महिलांना तात्काळ उमेदवारी दिली होती. त्यातील तिघींना यश मिळाले तर एकीला अपयशाला सामोरे जावे लागले. वॉर्ड नं. 11 मधून शिवसेनेच्या रिद्धी भास्कर खुरसंगे निवडून आल्या आहेत. वॉर्ड नं 18 मधून शिवसेनेच्या संध्या विपुल दोशी निवडून आल्या आहेत. तर वॉर्ड नं 25 मधून माधुरी योगेश भोईर निवडून आल्या आहेत. या तिघांनीही महापालिका निवडणुकीच्या घोषणेनंतर शिवसेनेत प्रवेश केला होता. रिद्धी भास्कर खुरसंगे, संध्या विपुल दोशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून शिवसेनेमध्ये प्रवेश केला तर माधुरी योगेश भोईर यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश करुन योग्य टायमिंग साधला असे बोलले जात आहेत. उत्तर मुंबईतून या तिघींनाही शिवसेनेच्या तिकीटांवर विजय मिळविता आला. तर भारती चेतन कदम यांनी मनसे मधून शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र वॉर्ड क्र. 14 मधून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.