मुलुंडमधील शिवसेनेचे उमेदवार निश्चित

  Mulund
  मुलुंडमधील शिवसेनेचे उमेदवार निश्चित
  मुंबई  -  

  मुलुंड - मुलुंडच्या टी वॉर्डमधल्या सहा प्रभागातील शिवसेनेचे उमेदवार निश्चित झाले आहेत. सर्व उमेदवारांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज भरले. वॉर्ड 103 मधून गोपीनाथ संसारे, वॉर्ड 104 मधून रोहिदास देवाडे, वॉर्ड 105 मधून रसिका तोंडवळकर, वॉर्ड 106 मधून अभिजित कदम, वॉर्ड 107 मधून मालती शेट्टी, तर वॉर्ड 108 मधून मुकेश कार्या यांनी अर्ज भरले आहेत. या वेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बरीच गर्दी केली होती. तसंच शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्नही शिवसेनेकडून करण्यात आला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.