'रवींद्र गायकवाड यांना सायकलने येऊ द्या'

 Mumbai
'रवींद्र गायकवाड यांना सायकलने येऊ द्या'

मुंबई - एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेनं मारहाण करणाारे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड सध्या चर्चेत आहेत. सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. लेखिका शोभा डे यांनी गायकवाड यांच्यावर निशाणा साधला आहे. गायकवाड यांना सायकलने प्रवास करून परत येऊ द्या अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

देशातील प्रमुख कंपन्यांनी गायकवाड यांना काळ्या यादीत टाकले आहे. त्यामुळे गायकवाड यांना ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसने प्रवास करून मुंबईत परतावे लागले. यावरही शोभा डे यांनी टीका केलीय. सर्व विमान कंपन्या रवींद्र गायकवाड यांच्यावर बंदी आणत आहेत त्याचं अनुकरण भारतीय रेल्वेने करायला नको का? असे ट्विट शोभा डे यांनी केले आहे. शोभा डे यांनी एक व्यंगचित्रही ट्विटरवर शेअर केले आहे.

शोभा डे यांच्या ट्विटवर मजेशीर ट्विट त्यांच्या फॉलोअर्सनी केली आहेत.Loading Comments