Advertisement

भारत बंद: दादरमधील फूल मार्केट, सर्व दुकानं बंद

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पुकारण्यात आलेल्या 'भारत बंद' आंदोलनाला देशभरासह मुंबईतही सकारात्म प्रतिसाद मिळत आहे.

भारत बंद: दादरमधील फूल मार्केट, सर्व दुकानं बंद
SHARES

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पुकारण्यात आलेल्या 'भारत बंद' आंदोलनाला देशभरासह मुंबईतही सकारात्म प्रतिसाद मिळत आहे. मुंबईतील अनेक परिसरातील दुकानदारांनी आपली दुकानं बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. शिवाय, नेहमीच गर्दीचं ठिकाण म्हणून ओळखलं जाणाऱ्या दादर परिसरातील ही दुकानं बंद आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी दादरमधील दुकानदारांनी मंगळवारी सकाळपासून दुकानं बंद ठेवली आहे.


दादरमधील छोटी मोठी सर्व दुकानं बंद आहेत. दुकानं बंद असल्यानं अनेकांची गैसयोय होत आहे. तसंच, मुंबईची दूध कोंडी होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारनंतर मुंबईत दुधाचे टँकर्स येणार नसल्याची माहिती समोर आली आहे. ही बातमी समजताच आता नागरिकांनी दूध खरेदीसाठी गर्दी केली आहे. 

मुंबईतील कुर्ला दूध डेअरीच्या परिसरात दूधाच्या गाड्या पोहोचल्या. यानंतर दुग्ध वितरण संघाकडून दुपारनंतर मुंबईत दूध पाठवले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळं मुंबईकरांनी आत्ताच दूध विकत घ्यावं, असं आवाहन राजाराम बापू पाटील सहकारी दूध लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे. परिणामी सामान्य ग्राहक दुधाच्या खरेदीसाठी डेअरी आणि दुकानांवर गर्दी करताना दिसत आहेत.


बेस्ट आणि टॅक्सीची वाहतूक सुरू

दिल्लीत सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पुकारण्यात आलेल्या 'भारत बंद'ला मुंबईत सकाळच्या सत्रात फारस प्रतिसाद मिळताना दिसत नाही. कारण, मुंबईच्या रस्त्यांवर आज सकाळपासूनच वाहनांची वर्दळ नेहमीप्रमाणे दिसत आहे. बेस्ट बसेस, टॅक्सी आणि रिक्षा रस्त्यांवर नेहमीप्रमाणे धावत आहेत. बेस्ट प्रशासनानं यापूर्वीच आम्ही 'भारत बंद' आंदोलनात सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळं सुरक्षेचा उपाय म्हणून बेस्टच्या बसेल लोखंडी जाळ्या लावून रस्त्यावर उतरवण्यात आल्या आहेत.

दुसरीकडे मुंबईतील टॅक्सी संघटनेकडूनही मंगळवारी आपली सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळं मुंबईच्या रस्त्यांवरील वर्दळ सामान्य राहण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईत ५ ही बाजार समित्या बंद

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये एपीएमसी मार्केट सहभागी झाले असून, नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात आज कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. एपीएमसी मधीलपाचही बाजारपेठा आज पूर्ण बंद ठेवण्यात आल्या असून नव्या शेतकरी कायद्यामुळे शेतकाऱ्यांसोबत माथाडी कामगारांचा देखील रोजगाराचा प्रश्न उपस्थित होणार असल्याने माथाडी बंदमध्ये सहभागी झाले आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा