श्रद्धा जाधव, राम बारोट यांचा विजयी षटकार

  Mumbai
  श्रद्धा जाधव, राम बारोट यांचा विजयी षटकार
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत परळ-भोईवाड्यातील प्रभाग २०२ मधील शिवसेनेच्या उमेदवार श्रद्धा जाधव यांच्यासह मालाडमधील भाजपाचे उमेदवार डॉ. राम बारोट यांनी सलग सहाव्यांदा विजय मिळवत विजयी षटकार ठोकला आहे. संपूर्ण मुंबईत सहाव्यांदा विजय मिळवणारे हे दोनच उमेदवार असून, श्रद्धा जाधव यांच्याविरोधात काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी शक्ती पणाला लावूनही मुरलेल्या राजकारण्याप्रमाणे श्रद्धा जाधव यांनी पुन्हा परळ-शिवडीत परतत तेवढ्याच मताधिक्यांनी विजय मिळवला.

  शिवसेनेच्या श्रद्धा जाधव आणि राम बारोट हे मार्च १९९२च्या निवडणुकीत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर सलग पाच वेळा हे दोन्ही उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. श्रद्धा जाधव या १९९७ पासून परळ-शिवडीमधून निवडून येत होत्या. परंतु सन २००७ च्या निवडणुकीत आरक्षणामुळे त्यांना अँटॉप हिलमध्ये जावे लागले. त्यानंतर आता मार्च २०१७ च्या महापालिका निवडणुकीत परळ-शिवडीमधील प्रभाग २०२ मधून हा मतदारसंघ खुला झाल्यानंतर श्रद्धा जाधव यांनी पुन्हा या ठिकाणाहून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली. परंतु याला शिवसेनेतील स्थानिकांकडून विरोध केला. परंतु त्यानंतरही निवडणूक लढवत त्यांनी तब्बल ६१०० मतांनी विजय मिळवला.

  तर भाजपाचे मालाडमधील राम बारोट हे सध्या प्रभाग ४५ मधून निवडणूक रिंगणात होते. त्यांनी शिवसेनेचे राजेंद्र नंदकुमार काळे यांचा पराभव करत सहाव्यांदा विजय मिळवला आहे. राम बारोट यांनी उपमहापौरपद तसेच सुधार समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे. राम बारोट यांनी २०१४ची विधानसभा निवडणूक लढवली आहे. पण त्यात त्यांचा पराभव झाला होता. परंतु बारोट यांनी या महापालिकेत विजय मिळवत विजयाची घौडदौड सुरू आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.