Advertisement

अयोध्येत बुद्ध विहार बांधा, गायक आनंद शिंदेंची मागणी

उत्तर प्रदेशातील अयोध्येत उत्खननात सापडलेल्या बुद्धकालीन प्राचीन अवशेषांचं जतन करण्यासाठी अयोध्येत मोठं संग्रहालय आणि महाबुद्ध विहार झालं पाहिजे, अशी मागणी गायक आनंद शिंदे यांनी केली आहे.

अयोध्येत बुद्ध विहार बांधा, गायक आनंद शिंदेंची मागणी
SHARES

उत्तर प्रदेशातील अयोध्येत उत्खननात सापडलेल्या बुद्धकालीन प्राचीन अवशेषांचं जतन करण्यासाठी अयोध्येत मोठं संग्रहालय आणि महाबुद्ध विहार झालं पाहिजे. त्यासाठी सर्व बौद्ध नेत्यांनी गटतट विसरून एकत्र यावं. पक्षीय मतभेद विसरून या प्रश्नावर लढा उभारला पाहिजे, असं आवाहन प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी केलं आहे. सोशल मीडियावरून आनंद शिंदे यांनी हे आवाहन केलं आहे. (singer anand shinde demands to build buddha vihar in ayodhya with ram mandir)

यासंदर्भात आनंद शिंदे म्हणाले की, अयोध्येत सापडलेले प्राचीन अवशेष हे सिद्ध करतात की या ठिकाणी राम मंदिर किंवा बाबरी मशिदीच्या अगोदर बुद्धांची साकेत नगरी होती. याचे भक्कम पुरावे असल्याचा दावा आॅल इंडिया मिली काऊन्सिलचे सरचिटणीस खालिका अहमद यांनी सुद्धा केला आहे. उत्खनन करत असताना वेळोवेळी भगवान बुद्धांच्या प्राचीन मूर्त्या व अवषेश हेच भगवान बुद्धांच्या तत्कालीन साकेत नगरीचे आणि बुद्ध विहार असल्याचे पुरावे आहेत. तरी या बुद्धमूर्त्या आणि अवषेश जतन करण्यासाठी पुरातन खात्याकडून संग्रहालय आणि महाबुद्धविहार निर्माण व्हावं यासाठी सर्व बौद्ध नेत्यांनी आपले गट-तट, संघटना, पक्ष बाजूला ठेवून या प्रश्नावर एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. आणि आपला हक्क आपण मागितला पाहिजे. 

हेही वाचा - Ram Mandir: बोलवलं तरी अयोध्येत भूमिपूजनाला जाणार नाही- शरद पवार

तिथं रामाचं मंदिर होतंय यावर काहीच हरकत नाही. मशिद बांधली जाईल, आमची हरकत नाही. पण जो आमचा अधिकार आहे. जे खरं आहे, ते सुद्धा जतन केलं पाहिजे. त्यामुळे सर्व आंबेडकरी कार्यकर्त्यांनी यासाठी लढा देण्याची तयारी ठेवली पाहिजे, अशी मागणी आनंद शिंदे यांनी केली आहे. 

येत्या ५ आॅगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी २०० निमंत्रितांनाच बोलवण्यात येणार आहे. यावरून सध्या राज्याच्या राजकारणात चांगलीच टोलवाटोलवी सुरू आहे. त्यातच आनंद शिंदे यांनी बुद्ध विहाराची मागणी करून त्यात भर घातली आहे. 

हेही वाचा - Ram Mandir: राम मंदिर भूमिपूजनाला जाणार उद्धव ठाकरे


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा