Advertisement

गायिका वैशाली माडेचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित ३१ मार्च २०२१ रोजी वैशाली माडेचा पक्ष प्रवेश होणार होता. मात्र, कोरोनाचं संकट वाढल्यामुळे हा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला होता.

गायिका वैशाली माडेचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
SHARES

महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका वैशाली माडे ( Vaishali Made) हिने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (nationalist congress party) प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी तिचं स्वागत केले. वैशालीच्या प्रवेशाचा कार्यक्रम पक्षाच्या मुंबई (mumbai) येथील मुख्यालयात झाला. 

पक्ष प्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी वैशालीचं स्वागत केलं आहे. मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी ट्विट करुन तिचं स्वागत केलं आहे. वैशाली माडे (vaishali made) ची राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या विदर्भ विभाग अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांच्या उपस्थित ३१ मार्च २०२१ रोजी वैशाली माडेचा पक्ष प्रवेश होणार होता. मात्र, कोरोनाचं संकट वाढल्यामुळे हा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर गुरूवारी वैशालीने  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी सुप्रिया सुळे, धनंजय मुंडेंसह राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

वैशाली ही विदर्भाच्या मूळ हिंगणाघाट येथील शेतकरी कुटुंबातील आहे. हिंदी आणि मराठीतील सिनेमांमध्ये तिनं पार्श्वगायन केलं आहे.  ‘बाजीराव मस्तानी’ या हिंदी सिनेमातील ‘पिंगा’ हे वैशाली माडे हिचं गाणं प्रचंड गाजलं होतं. या गाण्यासाठी तिला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

तिनं 'कलंक' या हिंदी सिनेमातील 'घर मोरे परदेसिया' हेही गाणं गायलं आहे. 'सारेगमप' या स्पर्धेची विजेती ठरल्यानंतर वैशालीला हिंदी सारेगमप या शोचीदेखील ती विजेती ठरली. हिंदी सारेगमपचा महासंग्रामही तिने जिंकला. दरम्यान, वैशाली 'मराठी बिग बॉस'च्या दुसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.



हेही वाचा - 

ओशिवरातील रहिवासी इमारतीला भीषण आग

मुंबईतील 'या' कोविड सेंटरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा ‘झिंगाट’ डान्स!

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा