Advertisement

आमचे सहा नगरसेवक नेले, शिंदेंनी तुमचे ३६ आमदार नेले - मनसे

एकनाथ शिंदे यांच्या बंडावरून मुंबईत मनसेने शिवसेनेची खिल्ली उडविण्यास सुरुवात केल्याचं चित्र दिसत आहे.

आमचे सहा नगरसेवक नेले, शिंदेंनी तुमचे ३६ आमदार नेले - मनसे
SHARES

एकनाथ शिंदे यांच्या बंडावरून मुंबईत मनसेने शिवसेनेची खिल्ली उडविण्यास सुरुवात केल्याचं चित्र दिसत आहे. मनसेचे चांदीवली विधानसभा अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी शिवसेनेला बॅनर्सच्या माध्यमातून डिवचलं आहे.

राज ठाकरे आणि अयोध्येमधील राम मंदिराचा फोटो असणारे बॅनर्स भानुशाली झाली आपल्या विधानसभा क्षेत्रात झळकावले आहेत. या बॅनर्सवर “त्यावेळी माझ्या राजसाहेबांचे नगरसेवक फोडलेत, आता कसं वाटतंय?” असा प्रश्न विचारला आहे.

मुंबई महानगरपालिकेमध्ये २०१७ साली मनसेचे सात नगरसेवक असताना शिवसेनेने त्यातील सहा नगरसेवकांचा गट फोडला होता. त्याच राजकीय घडामोडीची आठवण या बॅनर्सच्या माध्यमातून भानुशाली यांनी करुन दिलीय.

याचसंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना भानुशाली यांनी, “मी राजनिष्ठ कार्यकर्ता आहे. मी राजभक्त आहे. म्हणून मला वाटलं की त्यावेळी जे आम्हाला सातत्याने सांगत होते की सहा नगरसेवक गेलेत तर मनसे संपली. पण तुम्ही जे पेरणार तेच उगवणार आहे. एकनाथ शिंदे तुमचे ३६ आमदार घेऊन गेले. म्हणजे सहा गुणीले सहा. याचा अर्थ सहा पट देवाची लाठी तुम्हाला लागलेली आहे,” अशी प्रतिक्रिया दिलीय.

पुढे बोलताना, “काही दिवसांपूर्वी एकच बातमी चालायची की आम्ही खरे हिंदूत्व ते खोटे हिंदूत्ववादी. पूर्ण भारताने राज ठाकरेंच्या रुपाने कट्टर हिंदूत्ववादी नेता पाहिला. मात्र आज कशी परिस्थिती झालीय की तुमचेच आमदार सांगतायत तुम्ही हिंदूत्व सोडल्याने आम्हाला इथं जावं लागलं आहे.हेही वाचा

एकनाथ शिंदेंसोबतच्या 40 आमदारांच्या पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर, कॉन्स्टेबल, कमांडोंवर कारवाई!

maharashtra"="" target="_blank">Maharashtra Political Crisis: बंडखोर नेते एकनाथ शिंदे ईडीच्या कचाट्यात, संजय राऊत यांचा दावा">Maharashtra Political Crisis: बंडखोर नेते एकनाथ शिंदे ईडीच्या कचाट्यात, संजय राऊत यांचा दावा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा