आश्रमशाळा लाचखोरी प्रकरण: अखेर बडोलेंनी पीएला हटवलं

बडोले यांच्या पीएंनी आश्रमशाळेची फाईल मंजूर करण्यासाठी १० लाख रुपयांची लाच घेऊनही काम न केल्याचा आरोप निटुरे यांनी केला. या आरोपाचं खंडन करताना बडोले यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाला विनंती करून पीए आणि इतर कर्मचाऱ्यांना हटवण्यात आलं आहे.

  • आश्रमशाळा लाचखोरी प्रकरण: अखेर बडोलेंनी पीएला हटवलं
SHARE

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या कार्यालयात झालेल्या मारहाणप्रकरणी बडोले यांच्या पीएसहित एकूण ५ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर बुधवारी कारवाई करण्यात आली आहे.


कुणाचा समावेश?

यामध्ये बडोले यांचे पीए प्रविण शेट्ये, मारहाण झालेले लेखाधिकारी आणि दोन आॅपरेटर्सचा समावेश आहे. या चौघांना त्यांच्या मूळ विभागात पाठवण्यात आलं आहे. तर बडोले यांचे पीएस रवींद्र माने यांनाही हटवल्याचं म्हटलं जात आहे. परंतु त्याला अद्याप सामाजिक न्याय विभाग कार्यालयातून दुजोरा मिळू शकलेला नाही.
काय होतं प्रकरण?

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचं मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावर कार्यालय आहे. त्यांच्या कार्यालयाशेजारील कक्षात पीए, पीएस, अधिकारी आणि कर्मचारी बसतात. उस्मानाबाद इथं आश्रमशाळा चालवणारे अरूण निटुरे यांनी त्यांच्या कामासंदर्भात तेथील एका अधिकाऱ्याची कार्यालयात भेट घेतली आणि पैसे देऊनही काम का होत नाही? याबाबत विचारणा केली. मात्र संबंधित अधिकाऱ्याने कुठलाही प्रतिसाद न दिल्याने निटुरे यांनी संतापून त्यांना मारहाण केली.


लाच घेतल्याचा आरोप

बडोले यांच्या पीएंनी आश्रमशाळेची फाईल मंजूर करण्यासाठी १० लाख रुपयांची लाच घेऊनही काम न केल्याचा आरोप निटुरे यांनी केला. या आरोपाचं खंडन करताना बडोले यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.

त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाला विनंती करून पीए आणि इतर कर्मचाऱ्यांना हटवण्यात आलं आहे. परंतु सामाजिक न्याय विभाग कार्यालयाची संपूर्ण जबाबदारी असलेले पीएस रवींद्र माने यांना हटवण्यात आलं की नाही याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.हेही वाचा-

सामाजिक न्यायमंत्र्यांच्या 'पीए'ला १० लाखांची लाच?

तर, उद्या मंत्रीही मार खातील! विखे-पाटीलसंबंधित विषय
ताज्या बातम्या