तर, उद्या मंत्रीही मार खातील! विखे-पाटील

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या स्वीय सहायकावर १० लाख रूपयांच्या लाचखोरीचा आरोप झाल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर बुधवारी जोरदार निशाणा साधला.

SHARE

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या स्वीय सहायकावर १० लाख रूपयांच्या लाचखोरीचा आरोप झाल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर बुधवारी जोरदार निशाणा साधला. आज भ्रष्ट पीएंना मारहाण होते, अशीच परिस्थिती राहिल्यास हीच वेळ उद्या मंत्र्यांवरही ओढवू शकते, असा इशाराच त्यांनी सरकारला दिला.


काय म्हणाले विखे पाटील?

पैसे घेऊन काम झालं नाही म्हणून चक्क मंत्र्यांच्या दालनात हाणामारी होण्याचा आगळावेगळा ‘पराक्रम’भाजप-शिवसेना सरकारच्या नावे नोंदला गेला आहे. सरकारने पारदर्शक कारभाराचं आश्वासन दिलेलं असताना मंत्रालयात नेमका कसा कारभार सुरू आहे, ते ‘पारदर्शक’ पद्धतीने समोर आलं आहे.

राज्यातील निम्म्याहून अधिक मंत्र्यांवर ठोस पुराव्यांसह भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे हे सरकार भ्रष्टाचाराविरूद्ध कोणतीही कारवाई करू शकत नाही, असा स्पष्ट संदेश सर्वत्र गेला असून, मंत्री तर मंत्री पण त्यांचे अधिकारीही खुलेआम भ्रष्टाचार करताना दिसत आहेत. परिणामी पैसे देऊन काम न झालेली मंडळी दिवसाढवळ्या मंत्रालयात घुसून अधिकाऱ्यांना मारहाण करू लागली आहेत. हीच वेळ उद्या मंत्र्यांवर आली तरी फारसे आश्चर्य वाटणार नाही, अशी बोचरी टीका विखे पाटील यांनी केली.


मंत्र्यांची दालने भ्रष्टाचाराचे अड्डे- मुंडे

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही याप्रकरणी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, सरकारमधील मंत्र्यांची दालने भ्रष्टाचाराचे अड्डे झाले आहेत. लोक उघड उघड पैसे दिल्याचं सांगून मंत्र्यांच्या दालनात जाऊन जाब विचारत आहेत. भ्रष्टाचाराच्या पैशावरून मंत्र्यांच्या दालनात हाणामारी होत आहे. हे राज्य भ्रष्टाचाराच्या बाबतीत किती पुढे गेलं आहे हे स्पष्ट होतं.

पैसे घेऊन काम करणारा कर्मचारी व मंत्री यांचा काही संबंध आहे का ? हे पैसे कोणासाठी घेतले जात होते, ज्या आश्रमशाळेच्या मान्यतेसाठी व अनुदानासाठी पैसे घेतले त्याच प्रमाणे आतापर्यंत बडोले यांच्या कार्यकाळात मान्यता दिलेल्या आश्रमशाळा आणि अनुदान हे पैसे देऊन केले का याची ACB चौकशी करण्याची मागणीही धनंजय मुंडे यांनी केली आहे.हेही वाचा-

सामाजिक न्यायमंत्र्यांच्या 'पीए'ला १० लाखांची लाच?

राज्यात भाजपा-सेनेविरूद्ध समविचारी पक्षांची महाआघाडीसंबंधित विषय
ताज्या बातम्या