सोरठिया घाटिक मुस्लीम समाजाची निवडणूक

 Pali Hill
सोरठिया घाटिक मुस्लीम समाजाची निवडणूक
Pali Hill, Mumbai  -  

वांद्रे - एस.व्ही.रोडवरील मस्जिदजवळ रविवारी सोरठिया घाटिक मुस्लिम समाजाच्या समितीची निवडणूक पार पडली. ही त्रिवार्षिक निवडणूक असल्याचं सोरठिया घाटिक समाजाचे सदस्य अबू बकर अब्दुल यांनी सांगितलं. या समाजाची निवडणुकीची ही परंपरा गेल्या 50 वर्षांपासूनची आहे. निवडणुकीत 40 उमेदवार सहभागी झाले होते. या समितीकडून अनेक सामाजिक कार्यक्रम राबवले जातात. या निवडणुकीसाठी माजी नगरसेवक राजा रहबर खान यांनीही सहकार्य केलं.

Loading Comments