Advertisement

महाराष्ट्रात बीएसपी आणि सपा यांच्यात होणार युती?

समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टी याच्यां उत्तर प्रदेशातील युतीनंतर आता महाराष्ट्रातही यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्रात बीएसपी आणि सपा यांच्यात होणार युती?
SHARES

समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टी यांच्या उत्तर प्रदेशातील युतीनंतर आता महाराष्ट्रातही यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात बीएसपी आणि सपा यांच्यात युती होऊ शकते. परंतू, ही युती किती जागांसाठी आपले उमेदवार उतरवणार याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही.  याबाबत पक्षासोबत होणाऱ्या बैठकीनंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचं समजतं.


काँग्रेसच्या अडचणीत वाढ

राज्यात प्रकाश आंबेडकर यांच्या भारीप आणि ओवेसींच्या एमआयएममध्ये युती झाली आहे. आगामी लोकसभा निवडणूक दोन्ही पक्ष  लढवणार आहेत. याचा त्यामुळे या दोन्ही पक्षांचं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसपुढे आव्हान असणार आहे. जर बसपा आणि सपा यांनी एकत्र येऊन लोकसभा निवडणूक लढवली तर याचा दुहेरी फटका काँग्रेसला बसणार आहे. काँग्रेसच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.


भारीपचे उमेदवार जाहीर

प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या पक्षाच्या १८ उमेदवारांची  घोषणा केली आहे. उमेदवारांची नावे माघारी घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दलित आणि मुस्लीम मते एकत्र करण्याचा भारीप आणि एमआयएमचा प्रयत्न आहे. याचाही मोठा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसणार आहे. 



हेही वाचा -

एसटीच्या प्रत्येक बसस्थानकावर साजरा होणार 'मराठी भाषा गौरव दिन'

सर्जिकल स्ट्राईकचे अधिवेशनात पडसाद, सर्वपक्षीय नेत्यांनी केलं कौतुक



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा